खिजगणतीत नसलेल्या पृथ्वीबाबांना मोदी NPA वाटणे स्वाभाविक, भाजपची जहरी टीका
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी हे बिनकामाची मालमत्ता (NPA) असल्याचं म्हटलंय. त्यावर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार पलटवार केलाय.
मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे देशात हाहा:कार माजला आहे. अशावेळी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टिका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींपासून अनेकांनी केलीय. राहुल गांधी, पी. चिदंबरम यांची तर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. अशावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी हे बिनकामाची मालमत्ता (NPA) असल्याचं म्हटलंय. त्यावर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार पलटवार केलाय. (Atul Bhatkhalkar criticizes Prithviraj Chavan for mentioning to PM Narendra Modi as NPA)
“महाराष्ट्र कॉंग्रेसच्याही खिजगणतीत नसलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदींना नॉन परफॉर्मिंग असेट (NPA) म्हणाले. UPAच्या कणाहीन पंतप्रधानांच्या काळात 2G, 4G, जिजाजी… असे अनेक ‘परफॉर्मन्स’ पाहिलेल्या पृथ्वीराज यांच्यासारख्या नेत्याला मोदी NPA वाटणे स्वाभाविकच”, असा टोला भातखळकर यांनी चव्हाणांना लगावलाय.
महाराष्ट्र कॉंग्रेसच्याही खिजगणतीत नसलेले माजी मुख्यमंत्री @prithvrj पंतप्रधान नरेंद्र मोदींना नॉन परफॉर्मिंग असेट (NPA) म्हणाले. UPAच्या कणाहीन पंतप्रधानांच्या काळात 2G, 4G, जिजाजी… असे अनेक ‘परफॉर्मन्स’ पाहिलेल्या पृथ्वीराज यांच्यासारख्या नेत्याला मोदी NPA वाटणे स्वाभाविकच.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 14, 2021
चव्हाणांची मोदींवर टीका
पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांचा एक फोटो ट्वीट केलाय. त्यावर देशातील सर्वात मोठे नॉन परफॉर्मिंग अॅसेट असं लिहिलेलं आहे. चव्हाण यांनी ट्वीट केलेला हा फोटो चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर चव्हाण यांनी गंगा नदीत वाहून येत असलेल्या मृतदेहांवरुनही भाजपवर जोरदार टीका केली आहे. एक फोटो ट्वीट करत त्यात कोविड रुग्णांचा खरा आकडा आता गंगा नदीत सापडण्यास सुरुवात झाल्याचं या फोटोमध्ये म्हटलंय.
— Prithviraj Chavan (@prithvrj) May 13, 2021
‘यशोमती ठाकूर यांचा निषेध’
भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरुनही भातखळकर यांनी राज्य सरकार आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा निषेध व्यक्त केलाय.
अमरावतीत रेमडीसीवीरचा काळा बाजार करणाऱ्या ‘वाझे’ला कोणाचा आशिर्वाद? मोठे मासे वाचवण्यासाठी चोरांचा सखोल तपासच केला नाही. याप्रकरणी आवाज उठवणारे भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्यावर गुन्हे दाखल केले. पालकमंत्री यशोमती ठाकूर, वसूली सरकारचा निषेध ! #WeSupportShivarayKulkarni
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 14, 2021
संबंधित बातम्या :
चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचारांची गरज, अशोक चव्हाण यांचा पलटवार
सर्व केंद्राने करायचं मग राज्याने माशा मारायच्या का?; देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
Atul Bhatkhalkar criticizes Prithviraj Chavan for mentioning to PM Narendra Modi as NPA