Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ते रोज लवंग्या फोडतात, आम्ही बॉम्ब फोडणार’, प्रसाद लाड यांचा ठाकरे सरकारला इशारा

मला, दरेकर, गिरीश महाजन, चित्रा वाघ, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील या सगळ्यांना राज्य सरकार त्रास देत आहे. ते आम्हाला सोडत नाहीत, चौकशी सुरु आहे. राज्य सरकार यंत्रणेचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचा गंभीर आरोप लाड यांनी केलाय.

'ते रोज लवंग्या फोडतात, आम्ही बॉम्ब फोडणार', प्रसाद लाड यांचा ठाकरे सरकारला इशारा
प्रसाद लाड, आमदार, भाजप
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 3:18 PM

मुंबई : मुंबई ड्रग्स प्रकरणानंतर राज्यात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये जोरदार वाक् युद्ध रंगलं आहे. दिवाळीच्या तोंडावर रायकीय फटाके फुटत आहेत. अशावेळी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय. ते रोज लवंग्या फोडत आहेत, दिवाळीनंतर मोठा बॉम्ब फुटेल. देवेंद्र फडणवीस हा बॉम्ब फोडतील, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिलाय. (MLA Prasad Lad warns Mahavikas Aghadi government )

दिवाळीनंतर मोठा बॉम्ब फुटेल. देवेंद्र फडणवीस हा बॉम्ब फोडतील. निश्चितपणे मला याबाबत माहिती नाही. पण शनिवारी 26/11 आणि 93 ब्लास्टचे फटाके फुटणार, असा दावा लाड यांनी केलाय. जर टीव्हीवर फुटेज मिळालं असेल तर राज्य सरकारनं कारवाई करावी. मला, दरेकर, गिरीश महाजन, चित्रा वाघ, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील या सगळ्यांना राज्य सरकार त्रास देत आहे. ते आम्हाला सोडत नाहीत, चौकशी सुरु आहे. राज्य सरकार यंत्रणेचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याचा गंभीर आरोप लाड यांनी केलाय. फटाक्यांचा दारुगोळा फटाके फुटल्यानंतर समजतो. देवेंद्र फडणवीस मोठा फटाका फोडणार तेव्हा कळेल की घात घोतो की अपघात, असा सूचक इशाराही लाड यांनी दिलाय.

‘राऊतांनी फुसके फटाके फोडू नयेत’

संजय राऊत चौथ्यांदा खासदार झालेत. त्यांना शुभेच्छा देतो पण त्यांनी फुसके फटाके फोडू नयेत, असा टोला लाड यांनी लगावलाय. पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्मार्ट सिटी प्रकल्पात 600 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. त्याबाबतचं एक पत्र त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना पाठवलं होतं. त्यावेळी राऊत यांनी प्रसाद लाड यांच्या कंपनीचा या घोटाळ्यात समावेश असल्याचा आरोप राऊतांनी केला होता.

पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन ठाकरे सरकारला टोला

पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरुनही लाड यांनी राऊत आणि राज्य सरकारला टोला हाणलाय. उद्धव ठाकरे आणि शरद पवार राऊतांचं जास्त ऐकतात. राज्याने 20 रुपये कमी करावेत, अशी मागणी लाड यांनी केलीय.

गरीबीपासून सुरुवात केली. घर माझ्या बायकोनं सजवलं आहे. हिंदुंचा मोठा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते. कोरोनामुळे गेली दिवाळी दु:खात गेली. ही दिवाळी प्रदुषणमुक्त आणि कोरोनामुक्त जावो, अशा शुभेच्छा लाड यांनी दिल्या आहे.

इतर बातम्या :

‘फक्त घोषणा आणि भाषणं करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत’, रक्षा खडसे यांची ठाकरे सरकारवर टीका

अनिल परब शुद्धीत नव्हते, ईडीला काय कबुली जबाब दिला हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे काय?; किरीट सोमय्यांचा सवाल

MLA Prasad Lad warns Mahavikas Aghadi government

एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.