पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी राम कदम यांचे जनआक्रोश आंदोलन, आंदोलनापूर्वी पोलिसांच्या ताब्यात

राम कदम यांच्यासह 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. (BJP MLA Ram Kadam detained by Police)

पालघर मॉब लिंचिंगप्रकरणी राम कदम यांचे जनआक्रोश आंदोलन, आंदोलनापूर्वी पोलिसांच्या ताब्यात
Follow us
| Updated on: Nov 18, 2020 | 10:35 AM

मुंबई : भाजप नेते राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पालघर जिल्ह्यातील मॉब लिंचिंग प्रकरणी राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केले होते. राम कदम यांच्या खार येथील निवासस्थानापासून या यात्रेला सुरुवात होणार होती. मात्र घराबाहेर पडताच पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतलं आहे. राम कदम यांच्यासह 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. (BJP MLA Ram Kadam detained by Police)

राम कदम आज (18 नोव्हेंबर) सकाळी 8.30 वाजता खार येथील आपल्या निवासस्थानापासून ते पालघरमधील हत्याकांड झालेल्या घटनास्थळापर्यंत जनआक्रोश यात्रा काढणार असल्याचं जाहीर केलं होतं. पालघर हत्याकांड प्रकरणाला 211 दिवस उलटले आहेत. मात्र अद्याप यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ ही यात्रा काढण्यात येणार होती.

या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सकाळपासून राम कदम यांच्या निवासस्थानाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा हजर होता. यावेळी राम कदम यांच्या जमलेल्या कार्यकर्त्यांनी भारत माता की जय अशी घोषणाबाजी सुरु केली. मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी कारवाई करत राम कदम आणि त्यांच्या काही समर्थकांना ताब्यात घेतलं.

राम कदम यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीका केली. याप्रकरणी हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असून तो दुर्दैवी आहे, असे राम कदम म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

गडचिंचले गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला होता. गुरुवारी (16 एप्रिल) रात्री उशिरा एक इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहनचालकासह तिघे जण होते.

दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली.

पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत सर्वांना ताब्यात घेतलं. (BJP MLA Ram Kadam detained by Police)

संबंधित बातम्या 

पालघर हत्येच्या व्हिडीओतील नेतेमंडळी गृहमंत्र्यांच्या आजूबाजूला फिरत होती : प्रवीण दरेकर

Palghar Mob Lynching | नेमकं त्या दिवशी काय घडलं? गृहमंत्री थेट गडचिंचलेत, घटनास्थळी जाऊन आढावा

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.