राणा जगजितसिंहांचं सलग तिसरं पत्र, म्हणाले, ‘मुख्यमंत्री होऊन 22 महिने झाले तरीही एक बैठक नाही’
भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सलग तिसरं पत्र लिहिलं आहे. तिसऱ्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेऊन मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे.

मुंबई : भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सलग तिसरं पत्र लिहिलं आहे. तिसऱ्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेऊन मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री होऊन 22 महिने उलटले तरी उस्मानाबाद जिल्ह्याच्या अति महत्वाच्या विषयांकडे ठाकरे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. आजवर जिल्ह्यातील विकास कामांबाबत आपण एकही व्यापक बैठक घेतलेली नाही’, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
उस्मानाबाद जिल्ह्याचे अनेक विषय प्रलंबित
शिवसेनेच्या मंत्री महोदयांकडे तांत्रिक कापड निर्मिती प्रकल्प (टेक्निकल टेक्स्टाईल पार्क), सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद रेल्वे मार्ग, तुळजापूर शहराचा ‘प्रशाद’ योजनेत समावेश करणे, वॉटर ग्रीड, पीक विमा असे अनेक विषय प्रलंबितच आहेत, अशी तक्रारही त्यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यावर घोर अन्याय
रजाकारांपासून आम्हाला मुक्ती मिळून 73 वर्षे झाले व या मुक्ती संग्राम दिनी आपल्याला शुभेच्छा देत असताना उस्मानाबाद जिल्ह्यावर होत असेलल्या या घोर अन्यायाची जबाबदारी ठाकरे सरकारवरच असल्याचा घणाघात त्यांनी पत्रातून उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
केंद्र सकारात्मक, राज्य सरकार सहकार्य करत नाही, ही भावना वेदनादायी
उस्मानाबाद जिल्ह्यावर अन्याय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. ‘आकांक्षीत’ जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सकारात्मक असताना आपलेच राज्य सरकार सहकार्य करत नाही ही भावना खूप वेदनादायी असल्याचं राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्रातून म्हटलं आहे.
(BJP MLA Rana jagjeetSinh Patil Write a Letter to Cm Uddhav Thackeray Over osmanabad District probleam)
हे ही वाचा :
राणा जगजितसिंह पाटील मैदानात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सडेतोड पत्र