AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय आखाड्यातील बापलेकात ‘डावपेच’, सुरेश धस यांची मुलासोबत कुस्ती

सुरेश धस आणि त्यांच्या मुलामध्ये कुस्तीचा डाव रंगला असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.

राजकीय आखाड्यातील बापलेकात 'डावपेच', सुरेश धस यांची मुलासोबत कुस्ती
| Updated on: Nov 02, 2020 | 5:06 PM
Share

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासह बॅडमिंटन खेळतानाचा फोटो सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला. त्यानंतर राजकारणातील आणखी एका ‘दादा’ नेत्याचा मुलासोबत खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. राजकारणातील हे दिग्गज व्यक्तिमत्त्व आहे भाजप आमदार सुरेश धस, तर खेळ आहे कुस्तीचा. (BJP MLC Suresh Dhas plays Kusti with son Wrestling video goes viral on Social Media)

राजकारण आणि कुस्ती यांच्यात म्हणायला गेलं, तर जवळचा संबंध आहे. राजकारणाप्रमाणे कुस्तीतही विविध डाव-पेच असतात. कधी प्रतिस्पर्ध्याला चितपट करावे लागते, तर कधी धोबीपछाड दिली जाते. कधी कोण-कोणाला आस्मान दाखवेल नेम नाही, तर कधी ‘दोस्तीत कुस्ती’ खेळली जाईल, याचाही भरोसा नाही.

राजकीय पितापुत्रांमध्ये बुद्धिबळ, बॅडमिंटन, टेनिस यासारख्या बैठ्या अथवा मैदानी खेळांचे सामने रंगल्याचं क्वचित आपण पाहिलं असेल. मात्र बापलेकातच, तेही राजकीय आखाड्यातील बाप-लेकात कुस्तीसारखा मातीतला, अस्सल रांगडा खेळ रंगल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळेच सुरेश धस आणि त्यांच्या मुलामध्ये कुस्तीचा डाव रंगला असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ नेमका कधी, कुठे शूट झाला, याची माहिती नाही, मात्र सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.

कोण आहेत सुरेश धस?

सुरेश धस हे बीडच्या राजकारणातील एक मोठं नाव. ‘आण्णा’ म्हणून ते समर्थकांमध्ये लोकप्रिय आहेत. धस हे सध्या भाजपच्या तिकीटावर विधानपरिषदेवर निवडून गेले आहेत. राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेल्या अशोक जगदाळे यांचा पराभव करुन सुरेश धस जून 2018 मध्ये अटीतटीच्या लढतीत विधानपरिषदेवर गेले.

भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुरेश धस राष्ट्रवादीत होते. त्यांनी राज्यमंत्रिपदही भूषवले आहे. सुरेश धस यांनी 2014 मध्ये बीड मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे लोकसभा निवडणूकही लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 2009 मध्ये आष्टी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार होते.

‘सालकरी’ ही संकल्पना राजकारणात रुढ

आष्टी मतदारसंघात निवडून आल्यानंतर आपण आमदार नाही, तर पाच वर्षांसाठी मतदारांचे सालकरी आहोत, असे सांगत धस यांनी ‘सालकरी’ ही संकल्पना राजकारणात रुढ केली. (BJP MLC Suresh Dhas plays Kusti with son Wrestling video goes viral on Social Media)

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या ऊसतोड आंदोलनाच्या केंद्रस्थानी सुरेश धस आहेत. ऊसतोड आंदोलनात पंकजा मुंडे आणि सुरेश धस आमनेसामने आल्या होत्या. ऊसतोड मजूर आणि मुकादमांचे नुकसान होऊ नये, यासाठी त्यांनी संघटनेच्या वतीने पुकारलेला संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

संबंधित बातम्या :

ऊसतोड मजुरांचा संप स्थगित; सुरेश धस यांची घोषणा

सुरेश धस ऊसतोड कामगारांना धमकी देताय काय?; पंकजा मुंडेंचा थेट इशारा

(BJP MLC Suresh Dhas plays Kusti with son Wrestling video goes viral on Social Media)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.