दसऱ्याच्या आधी उद्धव ठाकरेंना याकूबच्या कबरीला मजार बनवण्याचं कारण जनतेला द्यावं लागेल- मोहित कंबोज
भाजप नेते मोहित कंबोज यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आव्हान दिलंय. सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेला दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवरून त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.
मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आव्हान दिलंय. सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेला दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवरून त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. दसऱ्याच्या आधी उद्धव ठाकरेंना याकूब मेमनच्या कबरीला मजार बनवण्याचं कारण जनतेला द्यावं लागेल, असं मोहित कंबोज म्हणाले आहेत. त्यामुळे आता या सगळ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना काय उत्तर देणार हे पाहाणं महत्वाचं असेल.