सीटबेल्ट लावला, गाडी काढली आणि दाणकन खांबावर आपटली, उदयनराजेंना डोक्याला हात मारायला लावणारा किस्सा काय?

डॉ. निलेश साबळे यांनी उदयनराजे यांना पुष्पा मधील डायलॉग सादर करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी, पुष्पा झुकेगा नहीं साला, म्हणत स्टाईल मारुन दाखवली. त्यानंतर हमे तुमसे प्यार कितना, हे गाणंही त्यांनी गायलं.

सीटबेल्ट लावला, गाडी काढली आणि दाणकन खांबावर आपटली, उदयनराजेंना डोक्याला हात मारायला लावणारा किस्सा काय?
उदयनराजे भोसलेंनी चला हवा येऊ द्यामध्ये सांगितला किस्साImage Credit source: झी मराठी
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 7:19 AM

सातारा : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखले जातात. झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ (Chala hawa yeu Dya) या लोकप्रिय कार्यक्रमात उदयनराजेंनी नुकतीच हजेरी लावली. निमित्त होतं ते उदयनराजेंच्या वाढदिवसाचं. सातार नगरीत आयोजित या कार्यक्रमाला उदयनराजेंच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी उदयनराजेंनी चक्क हवेत बाईकवर स्वार होत या कार्यक्रमात एन्ट्री घेतली. सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळेंशी गप्पा मारताना उदयनराजेंनी आपल्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले. त्यापैकी एक म्हणजे एअरबॅग चेकिंगचा.

एअरबॅग तपासण्याची उदयनराजे स्टाईल

गाडीला अपघात झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअरबॅग्ज ही अद्ययावत प्रणाली सध्या अनेक नव्या कारमध्ये असते. मात्र आपली कार खरंच एअरबॅग्जसज्ज आहे का, असा सुप्त सवाल अनेक वाहन चालकांच्या मनात असतो. परंतु ते तपासून पाहण्याची कुठलीही सुविधा नाही. त्यामुळे बरेच जण त्याकडे कानाडोळा करतात. मात्र खासदार उदयनराजे भोसले यांच्या मनाला हा विचार शिवला आणि त्यांनी एअरबॅग्ज तपासून बघण्याचा निर्णय घेतला.

उदयनराजेंनी काय सांगितलं?

डॉ. निलेश साबळे यांनी एअरबॅग विषयीचा किस्सा विचारल्यावर आधी उदयनराजेंनी डोक्याला हात लावला. त्यानंतर त्यांनी ही गोष्ट सांगायला सुरुवात केली. मात्र “कृपया याचं अनुकरण कोणीही करु नका” असं सुरुवातीलाच सांगत त्यांनी किस्सा कथन केला. “मी नुकताच गाडीचा कॉम्प्रिहेन्सिव इन्शुरन्स काढला होता. ज्यामध्ये सगळे पैसे परत मिळतात. सीटबेल्ट लावले. दाणकन खांबावर गाडी घातली. एअरबॅग निघाले. याला चेकिंग म्हणतात. मात्र याचं अनुकरण कोणीही करु नका” असं आवाहन समर्थकांना करतानाच “तुमच्या गाड्या माझ्याकडे द्या, मी चेक करतो, तुम्ही काळजी करु नका.” असंही उदयनराजे मिश्किलपणे म्हणाले.

पुष्पा स्टाईल

डॉ. निलेश साबळे यांनी उदयनराजे यांना पुष्पा मधील डायलॉग सादर करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांनी, पुष्पा झुकेगा नहीं साला, म्हणत स्टाईल मारुन दाखवली. त्यानंतर हमे तुमसे प्यार कितना, हे गाणंही त्यांनी गायलं. तुटका फुटका आवाज आहे सांभाळून घ्या, असंही सांगायला ते विसरले नाहीत.

संबंधित बातम्या :

इनोव्हेटीव्ह साताराचं स्पेलिंग अचूक न सांगता येणाऱ्यांनी बोलू नये, उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला

मित्रांसोबत सिनेमागृहात,पुष्पा चित्रपटाच्या प्रेमात; उदयनराजेंनी लुटला आनंद

झुकेगा नही साला…! खासदार उदयनराजेंची “चला हवा येऊ द्या” मध्ये ग्रँड एन्ट्री

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.