AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gopal Shetty | मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची चर्चा, खासदार गोपाळ शेट्टी म्हणतात ‘नको!’

मला मंत्रिपद नको. मी खासदार म्हणून काम करत राहीन, अशी प्रतिक्रिया खासदार गोपाळ शेट्टी यानी 'टीव्ही9 मराठी'शी बोलताना दिली.

Gopal Shetty | मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची चर्चा, खासदार गोपाळ शेट्टी म्हणतात 'नको!'
| Updated on: Jun 28, 2020 | 5:12 PM
Share

मुंबई : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ फेरबदलात मला मंत्रिपद दिले तरी नको, मी खासदार म्हणूनच ठीक आहे, अशी भूमिका मुंबईतील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी घेतली आहे. केंद्रात मंत्रिपदासाठी शेट्टी तूर्तास तरी इच्छुक नाहीत. (BJP MP Gopal Shetty doesnt wishes Ministry in Modi Government)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ फेरबदलात माझे नाव असल्याची चर्चा मी माध्यमांतून ऐकली. मात्र मला मंत्रिपद नको. मी खासदार म्हणून काम करत राहीन, अशी प्रतिक्रिया खासदार गोपाळ शेट्टी यानी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिली.

जुलै महिन्यात नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात राज्यातून गोपाळ शेट्टी आणि सुरेश प्रभू यांची नावे चर्चेत आहे.

मंत्रिपदाला न्याय देऊ शकतील अशी माझ्यापेक्षा चांगली व्यक्तिमत्व भाजपात आहेत. मी खासदार राहूनच जनतेची सेवा चांगल्या प्रकारे करु शकतो, असं मत गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : 1962 ते आजच्या घडामोडी, संसदेत दोन हात करुया, अमित शाहांचे राहुल गांधींना खुले आवाहन

गोपाळ शेट्टी हे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. त्यांनी अभिनेत्री काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना पराभवाची धूळ चारली होती.  तब्बल 4 लाख 65 हजार 247 चे मताधिक्य मिळवत ते विजयी झाले होते.

शेट्टी सलग दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आले आहेत. याआधी दोन वेळा त्यांनी आमदारकी भूषवली आहे. तर भाजप मुंबईचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले आहे. मात्र केंद्रात मंत्रिपद घेण्याची त्यांची इच्छा नाही.

पुण्यातील परिवर्तन या सामाजिक संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून खासदारांचं रिपोर्ट कार्ड समोर आले होते. त्यात विधेयकांच्या बाबतीत भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

(BJP MP Gopal Shetty doesnt wishes Ministry in Modi Government)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.