एकदम खास! गडकरींकडून विकास निधी मिळावा म्हणून भाजप खासदाराचं वेटलॉस, 15 किलो वजन कमी केलं

उज्जेनचे भाजप खासदार अनिल फिरोजीया असं वजन कमी करणाऱ्या खासदाराचं नाव आहे

एकदम खास! गडकरींकडून विकास निधी मिळावा म्हणून भाजप खासदाराचं वेटलॉस, 15 किलो वजन कमी केलं
इंटरेस्टिंग किस्सा...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 9:50 AM

मुंबई : वजन (Weight loss) हा खरंतर अनेकांचा वीक पॉईंट आहे. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. अशातच एक इंटरेस्टिंग गोष्ट राजकीय वर्तुळातही घडली. एका भाजप खासदाराने (BJP MP) विकास निधी मिळावा म्हणून चक्क वजन कमी केलंय. तब्बल 15 किलो वजन या भाजप खासदारानं कमी केलंय. वजन कमी केलं, तर प्रत्येक किलोसाठी एक हजार कोटी रुपये दिले जातील, अशी अट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी टाकली होती. त्यानंतर खरोखरच वजन कमी करुन दाखवण्याची किमया भाजप खासदाराने करुन दाखवलीय. 125 किलोवरुन आता या खासदार महोदयांनी 15 किलो वजन कमी केलंय. विकास निधीसाठी फिटनेस राखणाऱ्या या खासदारांची सध्या चर्चा रंगली आहे. हा किस्सा राजकीय वर्तुळासोबत सर्वसामान्यांसाठीही चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरतोय.

कोण आहेत वेटलॉस करणारे खासदार?

उज्जेनचे भाजप खासदार अनिल फिरोजीया असं वजन कमी करणाऱ्या खासदाराचं नाव आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे त्यांनी विकास निधीची सातत्यानं मागणी केली होती. तेव्हा गडकरींनी त्यांना वजन कमी करण्याची अट टाकली. अखेर खासदार साहेबांनी खरोखरच मनावर घेतलं आणि 15 किलो वजन कमी करुन दाखवलंय. आता त्यांना कमी केलेल्या वजच्या प्रत्येक किलोमागे 1 हजार कोटी रुपये इतका घसघशीत विकास निधी नितीन गडकरी यांना द्यावा लागणार आहे.

हे सुद्धा वाचा

एका किलोमागे एक हजार कोटी

उज्जेनच्या विकासासाठी 15 हजार कोटी रुपयांची मागणी अनिल फिरोजिया यांनी केली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे ही मागणी करण्यात आलेली. त्यानंतर गडकरी यांनी त्यांच्यापुढे एक अट ठेवली. जर फिरोजिया यांनी वजन कमी केलं, तर प्रत्येक किलोसाठी 1000 कोटी रुपये विकासासाठी दिले जातील, असं गडकरींनी त्यांना म्हटलं होतं.

वजन कमी करणं, खायचं काम नाही, असं म्हणतात. कठीण गोष्ट भाजप खासदाराने शक्य करुन दाखवल्यानं चर्चांना उधाण आलंय. फेब्रुवारी महिन्यात फिरोजिया यांचं वजन 125 किलो होतं. आता त्यांनी 15 किलो वजन घटवलंय. उज्जैनच्या भाजप खासदार अनिल फिरोजिया यांनी विकासकामांना निधी मिळवण्यासाठी वजन कमी करण्याच अट तर पूर्ण केली. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे या सगळ्याबद्दल काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.