AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंडेंच्या तीन बायका, तरी पवारांनी वाचवलं, आता राठोडांना ठाकरे वाचवतात, सोमय्या आक्रमक

संजय राठोड यांनी 22 वर्षांच्या तरुणीच्या आयुष्याचा सत्यानाश केला आहे, त्यांना उद्धव ठाकरे वाचवतात, असा घणाघाती आरोप किरीट सोमय्या यांनी केला. (Kirit Somaiya Sanjay Rathod)

मुंडेंच्या तीन बायका, तरी पवारांनी वाचवलं, आता राठोडांना ठाकरे वाचवतात, सोमय्या आक्रमक
संजय राठोड यांच्या अटकेसाठी सोमय्या आक्रमक
| Updated on: Feb 16, 2021 | 8:18 AM
Share

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी (Pooja Chavan Suicide Case) सर्वात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) वनमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. पोहरादेवी देवस्थानात राठोड गुरुवारी राजीनाम्याची घोषणा करण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या तीन बायका आहेत, तरी शरद पवारांनी त्यांना वाचवलं, आता संजय राठोडांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाचवत आहेत. राठोडांना अटक करायला हवी होती, अशी आक्रमक मागणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली. (BJP ex MP Kirit Somaiya demands arrest of Sanjay Rathod in Pooja Chavan Suicide Case)

“संजय राठोडांची हकालपट्टी व्हायला हवी”

उद्धव ठाकरे सरकार चालवतात की माफियांची टोळी, हा प्रश्न आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा नाही, तर त्यांची हकालपट्टी व्हायला हवी होती. राठोडांना ताबडतोब अटक करायला हवी होती. धनंजय मुंडेंना तीन-तीन बायका, त्यांना शरद पवार वाचवतात. संजय राठोड यांनी 22 वर्षांच्या तरुणीच्या आयुष्याचा सत्यानाश केला आहे, त्यांना उद्धव ठाकरे वाचवतात, असा घणाघाती आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

मुंबईच्या महापौरांनी गाळे ढापले, अनिल परब यांनी म्हाडाची जमिन ढापली, उद्धव ठाकरे यांनी १९ बंगले ढापले, असा आरोपही किरीट सोमय्यांनी केला.

शिवसेनेत दोन गट

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरुन शिवसेनेत दोन गट पडल्याची चर्चा आहे. राठोड यांनी राजीनामा देऊ नये, असे सेनेतील एका गटाचे म्हणणे आहे. यापैकी एक गट नैतिकता जपण्यासाठी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशा मताचा आहे. तर दुसरा गट संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये, असे म्हणत आहे.

संजय राठोड यांचा राजीनामा का घ्यावा?

शिवसेनेतील एक गट संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, या मताचा आहे. नैतिकतेचा भाग म्हणून संजय राठोड यांनी राजीनामा देण्याची गरज आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण समोर आल्यापासून संजय राठोड एकदाही प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. ते नॉट रिचेबल आहेत. या सगळ्याचा फटका शिवसेनेच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला संजय राठोड यांनी राजीनामा देणे योग्य ठरेल, असे शिवसेनेतील काही नेत्यांचे म्हणणे आहे.

संजय राठोड यांनी राजीनामा का देऊ नये?

गेल्या काही दिवसांत पूजा चव्हाण प्रकरणात नवीन खुलासे समोर आले आहेत. त्यामध्ये पूजाने कर्जाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांच्यावरही अशाप्रकारचे आरोप झाले होते. मात्र, तेव्हा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. मग संजय राठोड यांच्याबाबतीतच नैतिकतेचा आग्रह का धरायचा, असे शिवसेनेतील दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे.

संजय राठोड मौन सोडण्याची चिन्हं

संजय राठोड रविवारपर्यंत मुंबईत होते. परंतु त्यानंतर ते अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती आहे. पोहरादेवी देवस्थानात गुरुवारी राजीनाम्याची घोषणा करुन राठोड या प्रकरणी मौन सोडण्याचीही शक्यता आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण समोर आल्यापासून राठोड नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या चर्चगेटमधील घरी ते नव्हते, तर फोनवरही त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. (BJP ex MP Kirit Somaiya demands arrest of Sanjay Rathod in Pooja Chavan Suicide Case)

भाजपकडून कारवाईची मागणी

पूजा चव्हाण प्रकरणाची सखोल आणि व्यवस्थित चौकशी होऊन सत्य लोकांसमोर येईल. त्यानंतर गरज पडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांची ही भूमिका म्हणजे निव्वळ वेळकाढूपणा असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी हे प्रकरण सातत्याने लावून धरले आहे. त्यामुळे शिवसेनेवर संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याचा दबाव वाढत आहे.

संबंधित बातम्या :

संजय राठोड राजीनामा देण्याची दाट शक्यता; शिवसेनेत दोन गट

‘साप साप म्हणून भूई थोपटणं गरजेचं नाही’, पूजा चव्हाण प्रकरणात जयंत पाटलांची प्रतिक्रिया

(BJP ex MP Kirit Somaiya demands arrest of Sanjay Rathod in Pooja Chavan Suicide Case)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.