अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार? दापोलीतील साई रिसॉर्टच्या चौकशीसाठी दिल्लीहून पथक येणार, सोमय्यांचा दावा
किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेत परब यांच्याबाबत एक तक्रार केलीय. ही तक्रार परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टबाबत आहे.
मुंबई : परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेत परब यांच्याबाबत एक तक्रार केलीय. ही तक्रार परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टबाबत आहे. हा रिसॉर्ट परब यांनी काळ्या पैशातून बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. फक्त जावडेकरच नाही तर सोमय्या यांनी याबाबत ED, CBI, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडेही तक्रार केलीय. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. (Kirit Somaiya’s complaint against Anil Parab to Prakash Javadekar)
“पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉक डाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे ₹१० कोटीचा ( काळा पैसा) बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून पर्यावरण मंत्रालयाची विशेष टीम जाणार. ED, CBI, आयकर विभाग, महसूल मंत्रालय कडे ही मी तक्रार केली आहे’, असं ट्वीट करत सोमय्या यांनी याबाबत माहिती दिलीय.
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉक डाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे ₹१० कोटीचा बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून विशेष टीम जाणार. ED, CBI, आयकर विभाग, महसूल कडे ही मी तक्रार केली आहे. pic.twitter.com/0lRONJTFmJ
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 13, 2021
अनिल परब यांचं उत्तर
किरीय सोमय्या यांच्या या आरोपांवर अनिल परब यांनीही उत्तर दिलंय. पत्रकारांनी सोमय्यांच्या आरोपांबाबत विचारलं असता,सोमय्यांच्या आरोपांना आम्ही त्या त्या प्लॅटफॉर्मवर उत्तर देऊ, असं अनिल परब म्हणालेत.
सचिन वाझेचे आरोप, परबांकडून बाळासाहेबांची शपथ
यापूर्वी सचिन वाझे यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे अनिल परब अडचणीत आले होते. सचिन वाझेंच्या या आरोपांना अनिल परब यांनी उत्तर दिलं होतं. परब यांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझे यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते. तसंच आपण कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचंही परब यांनी म्हटलं होतं.
“दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत. मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपचे नेते दोन तीन दिवसांपासून आरडा ओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. म्हणजे हे प्रकरण आधीपासून माहिती होतं. सचिन वाझे आज पत्र देणार होता त्यामुळे तिसरी विकेट काढणार असं भाजपला आधीच माहिती होतं. एक आरोप माझ्यावर, एक अनिल देशमुख आणि एक आरोप अजित पवारांच्या जवळचा माणूस म्हणून घोडावत यांचं नाव घेण्यात आलं आहे”, असं परब यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
संबंधित बातम्या :
अनिल परबांना दोन मुलींची शपथ का घ्यावी लागली?, बाळासाहेबांचीही का घ्यावी लागली?; वाचा सविस्तर प्रकरण
Kirit Somaiya’s complaint against Anil Parab to Prakash Javadekar