त्या मंत्र्याने म्हटलं मला अजून 20 ते 22 चित्रपट करायचेत, अमित शाहनी सरळ तो कागद फेकून दिला

"चित्रपट माझी आवड, उत्साह आहे. जर मी चित्रपटात काम केलं नाही, तर मरुन जाईन. मी ओट्टाकोम्बन फिल्ममध्ये काम करण्यासाठी परवानगी मागितली आहे. मला अजूनपर्यंत परवानगी मिळालेली नाही"

त्या मंत्र्याने म्हटलं मला अजून 20 ते 22 चित्रपट करायचेत, अमित शाहनी सरळ तो कागद फेकून दिला
Union Home minister Amit Shah
Follow us
| Updated on: Aug 22, 2024 | 9:18 AM

केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये खासदार सुरेश गोपी हे पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस राज्य मंत्री आहेत. राजकारणात येण्याआधी ते अभिनेते होते. आजही अभिनय त्यांचा प्राण आहे. “अभिनय ही माझी आवड, उत्साह आहे. जर, मला चित्रपट करण्यापासून रोखलं, तर मी जिवंत राहू शकणार नाही” असं सुरेश गोपी म्हणाले. अभिनेता ते नेता बनलेले सुरेश गोपी केरळमधून निवडून आलेले भाजपाचे पहिले खासदार आहेत. त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली. सुरेश गोपी हे पर्यटन राज्य मंत्री आहेत.

तिरुवनंतपुरम येथे केरल फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. त्यावेळी गोपी म्हणाले की, “चित्रपट माझी आवड, उत्साह आहे. जर मी चित्रपटात काम केलं नाही, तर मरुन जाईन. मी ओट्टाकोम्बन फिल्ममध्ये काम करण्यासाठी परवानगी मागितली आहे. मला अजूनपर्यंत परवानगी मिळालेली नाही. पण 6 सप्टेंबरपासून मी ओट्टाकोम्बन चित्रपटात काम सुरु करणार आहे”

…नाहीतर मी मरुन जाईन

“मी जवळपास 20 ते 22 चित्रपटात अभिनय करण्याची तयारी दाखवली आहे. किती चित्रपट बाकी आहेत, असं मला विचारण्यात आलं, त्यावेळी मी अमित शाहना म्हणालो की, 20 ते 22 चित्रपटात काम करण्यासाठी मी सहमती दिलीय. त्यानंतर अमित शाहनी तो कागद फेकून दिला. मी नेहमीच माझ्या नेत्यांच म्हणण ऐकीन. पण चित्रपट माझी आवड, उत्साह आहे, नाहीतर मी मरुन जाईन” असं सुरेश गोपी म्हणाले.

पक्षाला अडचणीत आणणारी घेतली भूमिका

“मंत्री म्हणून काम करण्यासाठी मी मंत्रालयातून तीन ते चार लोकांना चित्रपटाच्या शूटिंगसाठी घेऊन जाईन” असं सुरेश गोपी म्हणाले. सुरेश गोपी यांचा कॅबिनेटमध्ये समावेश झाल्यानंतर त्यांनी पक्षाला अडचणीत आणणारी भूमिका घेतली होती. केंद्रीय मंत्रालयात सहभागी झाल्यानंतर सुरेश गोपी लगेच मीडियाला म्हणाले होते की, “मला एक खासदार म्हणून काम करायच आहे. मला कॅबिनेट बर्थ नको होतं. मी पक्षाला सांगितलेलं की, मला यात रस नाहीय. मला लवकरच दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. मी एक खासदार म्हणून चांगलं काम करीन हे त्रिशुरच्या लोकांना माहित आहे. मला चित्रपटात अभिनय करायचा आहे. पक्षाला त्यांचा निर्णय घेऊ दे”

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.