Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आता फक्त माझी जबाबदारी म्हणून हात वर करता येणार नाहीत’, खासदार नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना टोला

भाजपच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. फक्त माझी जबाबदारी म्हणून सरकारला हात वर करता येणार नाहीत, असं नवनीत राणा यांनी म्हटलंय.

'आता फक्त माझी जबाबदारी म्हणून हात वर करता येणार नाहीत', खासदार नवनीत राणांचा मुख्यमंत्र्यांना टोला
नवनीत राणा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 7:09 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना नव्या मोहीमेची घोषणा केली आहे. ‘माझी जबाबदारी’ या मोहिमेद्वारे लोकांनी आपली काळजी स्वत:च घेण्याचं आणि कोरोना विषयक नियम पाळण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. पण या मोहिमेवरुन आता भाजपच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. फक्त माझी जबाबदारी म्हणून सरकारला हात वर करता येणार नाहीत, असं नवनीत राणा यांनी म्हटलंय.(BJP MP Navneet Rana criticizes Thackeray government)

लॉकडाऊनला प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहे असं म्हणता येणाार नाही. ज्या प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत, नियम पाळत नाहीत, त्यामुळे लॉकडाऊन अपेक्षितच आहे. मात्र, लॉकडाऊन जाहीर करताना सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना वीज बिल माफी देणं सरकारचं कर्तव्य आहे. आधी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ आणि आता फक्त ‘माझी जबाबदारी’ म्हणून सरकारला हात वर करता येणार नाहीत, असं नवनीत राणा यांनी म्हटलंय.

सरकारमधील नेत्यांवर कारवाई का नाही?

दुसऱ्यांकडे नियम आणि बोट दाखवताना राज्यातील मंत्र्यांनीही आपली जबाबदारी समजून घ्यायला हवी. आम्ही शिवजयंची साजरी केली तर आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. मात्र, महाविकास आघाडीमधील नेत्यांचे जाहीर कार्यक्रम सुरु आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप राणा यांनी केला आहे. राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होऊ घातलं असतारा राष्ट्रवादीचे मंत्री कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत, यातून वेगळा संदेश जाऊ शकतो, असंही राणा यांनी म्हटलंय.

‘राज्य सरकारनं कर सवलत द्यावी’

पेट्रोल-डिझेल दरवाढीवर विचार करताना राज्य सरकारनंही नागरिकांना करात सवलत द्यायला हवी. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात नागरिकांना कर्जमाफी दिली होती त्यामुळे पेट्रोलवर अतिरिक्त भार पडला नाही, असा दावाही नवनीत राणा यांनी केलाय. त्याचबरोबर आपल्याला आलेल्या धमकीबाबत गृहखातं योग्य ती चौकशी करत आहे. पोकळ धमक्यांना घाबरणारी मी नाही, अशा शब्दात राणा यांनी धमकी देणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

राणा दाम्पत्यावर गुन्हा दाखल

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना कोरोनाचे नियम न पाळणं भोवलं आहे. अमरावती शहरात शिवजयंती कार्यक्रमात विनामास्क उपस्थित राहणे, तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा व कोरोनाचे नियम पायदळी तूडवल्या प्रकरणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ,आमदार रवी राणा यांच्या सह पंधरा कार्यकर्त्यांवर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परंतु, राणा दाम्पत्यावर बुलेट वर विनामास्क सवारी केल्या प्रकरणी पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नसल्याच समोर आलं आहे.

संबंधित बातम्या :

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर अखेर गुन्हा दाखल; कोरोनाचे नियम न पाळणे भोवले

अमरावतीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, राणा दाम्पत्याची विना मास्क बुलेटवारी!

BJP MP Navneet Rana criticizes Thackeray government