बाळासाहेब ठाकरेंकडून कौतुक, आता मोदी सरकारचे सर्वात कार्यक्षम मंत्री; जाणून घ्या कोण आहेत नितीन गडकरी?

त्यावेळी पंतप्रधानपदासाठी सर्वसमावेशक चेहरा म्हणून नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा होती. | Nitin Gadkari

बाळासाहेब ठाकरेंकडून कौतुक, आता मोदी सरकारचे सर्वात कार्यक्षम मंत्री; जाणून घ्या कोण आहेत नितीन गडकरी?
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 4:00 PM

मुंबई: महाराष्ट्रातील कोरोनाच्या मुख्य हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आणणारे नितीन गडकरी (Nitin Gadkari) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते नागपुरात ठाण मांडून बसले आहेत. गडकरी बसल्या जागेवरून योग्यपणे सूत्रे हाताळत नागपूर आणि विदर्भासाठी ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शन्स आणि वैद्यकीय सुविधा यापैकी कशाचीही कमी भासणार नाही, याची काळजी घेत आहेत. त्यामुळेच नागपुरातील परिस्थिती आता आटोक्यात आली आहे. (BJP MP Nitin Gadkari political journey)

त्यामुळे आता राष्ट्रीय पातळीवरही कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी नितीन गडकरी यांच्यावर जबाबदारी दिली जावी, अशी मागणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती. या मागणीला भाजप पक्ष आणि सामान्य लोकांमधून पाठिंबाही मिळताना दिसत आहे.

अर्थात नितीन गडकरी यांनी धडाडीने आणि अचूक नियोजन करून काम करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. केंद्रीय स्तरावर त्यांचे रस्ते व परिवहन खाते कायम चर्चेचा विषय असते. नितीन गडकरी यांच्या काळात देशभरात महामार्ग बांधणीचे प्रकल्प वेगाने सुरु आहेत. मोदी सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये नितीन गडकरी चर्चेत राहिले नाही, असे कधीच घडले नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला नितीन गडकरी मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात.

बाळासाहेब ठाकरेंकडून कौतुक

नितीन गडकरी हे शिवसेना-भाजप युती सरकारच्या 1995 ते 1999 या कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. या काळात त्यांनी मुंबईत सर्वाधिक उड्डाणपूल बांधण्याची कामगिरी करुन दाखविली. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकजण त्यांना ‘पुलकरी’ म्हणून करतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक होते. नितीन गडकरी यांच्यासारखा एखादा नेता शिवसेनेतही असायला हवा होता, असे उद्गार बाळासाहेब ठाकरे यांनी काढले होते.

भाजपचा संकटमोचक

एखाद्या राज्यात पेचप्रसंग निर्माण झाल्यास त्यामधून नितीन गडकरी मार्ग काढण्यात कुशल आहेत. 2017 मध्ये गोव्यात सत्तास्थापनेवेळी नितीन गडकरी यांचे आपल्या या कौशल्याची झलक दाखवून दिली होती. त्यावेळी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे काँग्रेस याठिकाणी सत्तास्थापन करेल, असा अंदाज होता.

मात्र, नितीन गडकरी यांनी गोव्यामध्ये जाऊन एका रात्रीत सगळी सूत्रे फिरवली होती. भाजपला कमी जागा मिळाल्यामुळे वाटाघाटींमध्ये आढेवढे घेणाऱ्या घटकपक्षांना त्यांनी तात्काळा पाठिंबा देण्यास राजी केले होते. घटकपक्षांच्या प्रमुखांमध्ये संभ्रमाचे वातावरण ठेवून त्यांनी आपला डाव बरोबर साधला होता. त्यामुळे गोव्यात पुन्हा एकदा भाजपची सत्ता स्थापन झाली होती.

पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये मोदींना पर्यायी चेहरा

नितीन गडकरी यांनी राजकारण आणि प्रत्यक्ष कामकाज या दोन्ही आघाड्यांवर स्वत:ला सिद्ध केले आहे. तसेच भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही नितीन गडकरी यांना आशीर्वाद आहे. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले नाही तर आघाडीचे सरकार स्थापन करताना पंतप्रधानपदासाठी सर्वसमावेशक चेहरा म्हणून नितीन गडकरी यांच्या नावाची चर्चा होती. अशा स्थितीत शरद पवार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासारखे नेते केवळ गडकरी यांच्यामुळे भाजपला पाठिंबा द्यायला तयार झाले असते, असे जाणकार सांगतात.

कोरोना परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी गडकरींकडे देण्याची मागणी

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे द्यावी, अशी मागणी केली होती. सोशल मीडियावर या मागणीला प्रचंड पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यामुळे काही काळ ट्विटवर #Gadkari हा हॅशटॅग ट्रेंडमध्येही होता.

गडकरीसाहेब म्हणाले, विदर्भातील ऑक्सिजनचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा’

कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने महाराष्ट्रात ऑक्सिजन तुटवडा जाणवत असताना नितीन गडकरी यांनी नागपुरात ठाण मांडून सूत्रे हाताळली होती. त्यांनी विदर्भासासाठी ऑक्सिजन आणण्याची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधताना त्यांनी म्हटले की, विदर्भातलं ऑक्सिजन पुरवठ्याचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा, असं वेगवेगळ्या भागातलं नियोजन वाढलं तर कोरोनाबाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करायला अडचण येणार नाही.

‘मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री’

मोदी सरकारच्या दोन्ही टर्ममध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांमध्ये नितीन गडकरी यांचा वरचा क्रमांक लागतो. नितीन गडकरी यांचा प्रशासनावर असणारा वचक आणि झपाट्याने काम उरकण्याची क्षमता या दोन्ही त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. याशिवाय, उपजत असलेल्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांना अनेक विषयांचे ज्ञान आहे. इंधननिर्मितीसाठी इथेनॉलचा प्रभावीपणे वापर असो किंवा महामार्ग प्रकल्पांचे वेगाने काम करण्याची हातोटी नितीन गडकरी यांच्याकडे आहे.

‘त्या’ महान अधिकाऱ्यांची छायाचित्रे इमारतीत लावा; नितीन गडकरी कामचुकार अधिकाऱ्यांवर संतापले

नितीन गडकरी यांच्या कार्यकाळात देशभरात महामार्ग बांधणीचे विक्रमी प्रकल्प हाती घेण्यात आले. नितीन गडकरी हे अत्यंत कठोर आणि खमके प्रशासक असल्याने ही बाब शक्य झाली. एरवी केंद्रातील सुस्तावलेल्या यंत्रणेला जागे करुन कामाला लावणे, ही साधी गोष्ट नसते. यासंदर्भात नितीन गडकरी यांचा एक किस्सा नेहमीच आवर्जून सांगितला जातो. 2020 मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) कामातील दिरंगाईबद्दल केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अधिकाऱ्यांची जाहीर खरडपट्टी काढली होती. दिल्लीच्या द्वारकामध्ये प्राधिकरणाच्या कार्यालय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते.

एखादे काम पूर्ण झाले की, संबंधितांचे अभिनंदन करायचे असते. पण, ही इमारत बांधल्याबद्दल तुमचे अभिनंदन करणार कसे? 2008 मध्ये ही इमारत बांधण्याचा निर्णय झाला, 2011मध्ये निविदा काढल्या. हे 200 कोटींचे काम पूर्ण व्हायला तब्बल नऊ वर्षे लागली. तोपर्यंत केंद्रात दोन सरकारे आली आणि प्राधिकरणाचे आठ अध्यक्षही बदलले. ज्या ‘महान’ अधिकाऱ्यांनी इमारत उभी करण्यासाठी नऊ वर्षे लावली, त्यांची छायाचित्रे या इमारतीत लावली पाहिजेत, अशी उपहासात्मक टिप्पणी गडकरी यांनी केली.

काही अधिकारी प्रकल्पासंदर्भात निर्णय घेण्यास विलंब लावतात, कामात गुंतागुंत निर्माण करतात. मुख्य महाव्यवस्थापक आणि महाव्यवस्थापक अशा पदांवर हे अधिकारी बसले आहेत. अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची किंवा त्यांना निरोप देण्याची वेळ आता आली आहे. जेणेकरून प्राधिकरणाच्या कामाकाजात सुधारणा होईल, असे गडकरी यांनी म्हटले होते.

(BJP MP Nitin Gadkari political journey)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.