काँग्रेसमध्ये नशीब बदललं नाही, आता शिवसेनेत बदलणार असेल तर शुभेच्छा, प्रितम मुंडेंचा उर्मिलाला टोमणा
"अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांच्या (Urmila Matondkar) प्रवेशामुळे शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा", असं म्हणत भाजप खासदार उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेला टोमणा मारला.
जालना : “उर्मिला मातोंडकरांच्या प्रवेशानं शिवसेनेचं (Shivsena) नशीब बदलणार असेल तर शुभेच्छा” (Pritam Munde Criticize Shivsena), असं म्हणत खासदार प्रितम मुंडे यांनी शिवसेनेला टोमणा लगावला आहे (Pritam Munde Criticize Shivsena).
“अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांच्या (Urmila Matondkar) प्रवेशामुळे शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा”, असं म्हणत भाजप खासदार उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेला टोमणा मारला. “उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. लोकसभेला त्यांनी काँग्रेसकडून नशीब आजमावून पाहिलं. आता शिवसेनेत गेल्यानं त्यांचं स्वत:चं नशीब किंवा शिवसेनेचं नशीब बदलणार असेल तर त्यांना माझ्या शुभेच्छा”, असं त्या म्हणाल्या.
राज्य सरकारची वर्षपूर्ती ही जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती : प्रितम मुंडे
महाविकास आघाडी सरकारला एकवर्ष पूर्ण झाले.या काळात सर्वच घटकांचे प्रश्न सोडविण्यास सरकारला अपयश आले.राज्यातील समस्या आणि सरकारचे अपयश जनतेसमोर मांडणे आमचे कर्तव्य आहे.आज जालना येथे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडले ( 1/2 )@BJP4Maharashtra pic.twitter.com/3M6YWee4Ml
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) November 30, 2020
राज्य सरकारची ही वर्षपूर्ती जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती असल्याचं म्हणत भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त प्रितम मुंडे यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. “कुठल्याच बाबतीत हे सरकार चांगलं काम करताना दिसत नाही. त्यामुळे त्यांची वर्षपूर्ती ही जनतेच्या निराशेची वर्षपूर्ती आहे” अशी टीका प्रितम मुंडे यांनी केली.
त्याचबरोबर लवकरच आपल्या कर्मानं हे जिथून आले तिथे परत जातील आणि भारतीय जनता पार्टी ही आपल्याला सत्तास्थानी दिसेल, असं प्रितम मुंडे यांनी म्हंटलं.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार, पत्रकार परिषदेत मोठे खुलासे करण्याची शक्यता https://t.co/2n3SRWz4sn @UrmilaMatondkar @OfficeofUT @ShivSena #ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2020
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार
काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवणारी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करत उर्मिला मातोंडकरने उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. पण लोकसभा निवडणुकीत उर्मिलाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादावर तोंडसुख घेत उर्मिलाने अवघ्या सहा महिन्यात पक्षाला रामराम ठोकला होता. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकरचं नाव देण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उर्मिला उद्या शिवबंधन हाती बांधणार आहे.
Pritam Munde Criticize Shivsena
संबंधित बातम्या :
सरकार नसतं तर जयंत पाटील भाजपमध्ये असते, नारायण राणेंचा मोठा दावा
शिवसेनेने आता फक्त हिरवा झेंडाच खांद्यावर घेणं बाकी आहे; भाजपची खोचक टीका
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आले आणि कोरोना आला, हाच त्यांचा पायगुण; राणेंची जळजळीत टीका