Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाथाभाऊंची सून, भाजपच्या खासदार, जाणून घ्या रक्षा खडसेंची राजकीय कारकीर्द

एकनाथ खडसे पक्षातून गेल्यानंतरही रक्षा खडसे यांनी भाजपमध्ये राहणे पसंत केले. | Raksha Khadse

नाथाभाऊंची सून, भाजपच्या खासदार, जाणून घ्या रक्षा खडसेंची राजकीय कारकीर्द
रक्षा खडसे, भाजप खासदार
Follow us
| Updated on: May 11, 2021 | 4:00 PM

मुंबई: जळगावच्या राजकारणाचा अविभाज्य भाग असलेल्या खडसे कुटुंबीयांच्या भूमिका हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. यापैकी रक्षा खडसे (Raksha Khadse) या दोन टर्म भाजपच्या खासदार झाल्या आहेत. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्या रावेर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. हिना गावित यांच्यासोबत रक्षा खडसे या 17 व्या लोकसभेतील सर्वात तरुण सदस्यांपैकी एक आहेत. (BJP MP Raksha Khadse Political Journey)

कोण आहेत रक्षा खडसे?

रक्षा खडसे यांचा जन्म 12 मे 1987 रोजी झाला होता. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांच्याशी झाले होते. निखिल खडसे यांनी आत्महत्या केल्यानंतर रक्षा खडसे यांनी राजकारणात पाऊल ठेवले. त्यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

दिवंगत पतीच्या पराभवाचा रक्षा खडसेंकडून वचपा

2011 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मनिष जैन यांनी एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांचा पराभव केला होता. तेव्हापासून जैन आणि खडसे यांच्यात कट्टर वाद सुरु झाला. विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर वर्षभरातच निखिल खडसेंनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. तेव्हापासून जैन आणि खडसेंमधील वाद विकोपाला पोहोचला होता. रक्षा खडसे यांनी 2014 च्या निवडणुकीत एकप्रकारे आपल्या दिवंगत पतीच्या पराभवाचा वचपा काढला होता.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी रावेर मतदारसंघातून मनिष जैन यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली होती. भाजपकडून हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी मिळालेली होती. अशात, ईश्‍वरलाल जैन यांनी ही निवडणूक खडसेंविरोधात असती तर मजा आली असती, असं वक्तव्य केले. खडसेंनी ते मनावर घेतलं. विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि प्रदेश भाजपातील महत्त्वाचे नेते म्हणून खडसेंच्या शब्दाखातर हरिभाऊ जावळेंची उमेदवारी रद्द झाली. त्यांच्याऐवजी खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. या निवडणुकीत रक्षा खडसे यांनी मनिष जैन यांचा दणदणीत पराभव केला होता.

एकनाथ खडसेंनी भाजप सोडल्यानंतरही रक्षा खडसे पक्षामध्ये राहिल्या

एकनाथ खडसे यांनी गेल्यावर्षी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या मुलीनेही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता. मात्र, रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहणे पसंत केले होते. मी भारतीय जनता पक्षातच राहणार आहे. भाजपला सोडणार नाही. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या व्यक्तिगत कारणांमुळे भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. मला भाजपमध्ये कुठलाही त्रास नाही, असे रक्षा खडसे यांनी त्यावेळी म्हटले होते.

भाजप खासदार असलेल्या सुनबाईंनी केलं राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसेंचं स्वागत

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे पहिल्यांदाच आपल्या मूळगावी कोथळी गावी आले होते. यावेळी ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी नाथाभाऊंचं औक्षण करून त्यांचं घरी स्वागत केलं. रक्षा खडसे या नाथाभाऊंच्या स्नुषा असल्या तरी त्या भाजपच्या खासदार आहेत. पक्ष बदलल्यानंतर खडसे गावी परतल्यानंतर त्यांचं रक्षा खडसे यांनी स्वागत केल्याने त्याची जोरदार चर्चा रंगली होती.

(BJP MP Raksha Khadse Political Journey)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.