Raosaheb Danve: ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री, कोण आहेत रावसाहेब दानवे?

जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले रावसाहेब यांचा 30 वर्षांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक आहे. | Who is Raosaheb Danve

Raosaheb Danve: ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री, कोण आहेत रावसाहेब दानवे?
रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 4:16 PM

मुंबई: ग्रामीण भागातील राजकारणाची उत्तम जाण आणि त्यावर पकड असणाऱ्या महाराष्ट्रातील खासदारांमध्ये रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री असा स्वप्नवत प्रवास करणारे रावसाहेब दानवे येन:केन कारणेन चर्चेत असतात. त्यांची खास अशी वकृत्त्वशैली ग्रामीण मतदारांना नेहमीच भावते. (BJP MP Raoshaeb Danve political journey)

अर्थात यामुळे काहीवेळा रावसाहेब दानवे अडचणीतदेखील आले आहेत. मात्र, त्यानंतरही रावसाहेब दानवे यांनी आपल्या राजकारणाचा ग्रामीण ढंग अद्याप जपून ठेवला आहे.

कोण आहेत रावसाहेब दानवे?

रावसाहेब दानवे यांचा जन्म 18 मार्च 1956 रोजी जालन्यातील जवखेडा खुर्द या गावात झाला. रावसाहेब दानवे हे कला शाखेचे पदवीधर (B.A.) आहेत. निर्मला दानवे या त्यांच्या पत्नी असून या दाम्पत्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे.

रावसाहेब दानवे यांचा राजकीय प्रवास

जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले रावसाहेब यांचा 30 वर्षांचा राजकीय प्रवास अत्यंत रंजक आहे. त्यांनी गावच्या सरपंचपदापासून ते केंद्रीय मंत्री अशी वाटचाल केली आहे. 1990 ते 1995 आणि 1995 ते 1999 या दोन टर्ममध्ये ते भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.

त्यानंतर 1999 साली रावसाहेब दानवे यांनी पहिल्यांदा जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही. सलग 5 वेळा जालना मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. संसदेच्या विविध समित्यांवर त्यांना कामाचा अनुभव आहे. यामध्ये वाणिज्य, संसदीय स्थायी समिती, संसदीय सल्लागार समिती, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू संसदीय समिती आणि कृषी या समित्यांचा समावेश आहे. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली. मात्र, एकनाथ खडसे यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा दिल्याने नऊ महिन्यांतच रावसाहेब दानवे महाराष्ट्रात परतले होते. त्यानंतर दानवे यांच्या भाजप प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले होते. तर 2019 मध्ये पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली होती.

जावयासोबतच्या वादामुळे प्रतिमा डागाळली

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे रावसाहेब दानवे यांचे जावई होते. मात्र, रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव यांच्या नात्यातील कलहामुळे दानवेंची प्रतिमा अलीकडच्या काळात बरीच डागाळली. हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

रावसाहेब दानवे यांनी मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला. मी दानवेंना परत एकदा हात जोडतो. कृपया तुम्ही जगा आणि मलाही जगू द्या. मी शेवटचं सांगतोय. दानवेंनी मी वेडा असल्याचं सर्टिफिकेट आणण्याचा प्रयत्न करु नये, कारण मी वेडा नाही. पण लोकांना तुमची प्रमाणपत्र देत फिरु नका. तुमचं वेडेपणा थांबवा. हे मीटवा. घरातील गोष्टी घराबाहेर जावू नये. पण दुर्देवाने तुम्ही त्या घराबाहेर घातल्या. त्याचं खापर तुम्ही माझ्यावर फोडत आहात. उलट मलाच वेडं ठरवत आहात.

मला असं वाटतंय की, चार भींतीत मतभेद मिटवा. तरीही तुम्हाला हर्षवर्धनला वेडं ठरवायचं असेल तर जे होईल ते बघितलं जाईल. मला नैराश्य निश्चित आलं होतं. आत्महत्या करण्याचा विचार आला होता. पण माझ्या सगळ्या मित्रांनी प्रेम दिलं, माझ्याबरोबर कुणीतरी आहे याची जाणीव झाली. खूप लोकं माझ्यासोबत प्रेमाने उभी राहिली आहेत. त्यामुळे अन्यायाविरोधात लढणार, असे हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

हर्षवर्धन जाधव आणि रावसाहेब दानवे यांच्यातील वाद नेमका काय? जाधव यांची राजकीय कारकीर्द कशी?

“मला दानवेंचा जावई म्हणू नका” माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा घटस्फोटासाठी अर्ज

(BJP MP Raoshaeb Danve political journey)

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...