संजयकाका म्हणाले, नको नको नको, जयंत पाटलांनी आग्रहाने शेजारी बसवलं

संजयकाका नको नको म्हणत असताना, जयंत पाटलांनी त्यांना जवळ बसवून घेतले. त्यानंतर दोघांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा रंगली.

संजयकाका म्हणाले, नको नको नको, जयंत पाटलांनी आग्रहाने शेजारी बसवलं
Jayant Patil_Sanjay Kaka Patil
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 12:13 PM

सांगली : भाजप खासदार संजय काका पाटील (BJP MP Sanjaykaka Patil) यांना सांगलीचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी जवळ बोलावून आग्रहाने जवळ बसवले. संजयकाका नको नको म्हणत असताना, जयंत पाटलांनी त्यांना जवळ बसवून घेतले. त्यानंतर दोघांमध्ये जवळपास 15 मिनिटं चर्चा रंगली. सांगली जिल्हा परिषदेच्या ‘माझी शाळा आदर्श शाळा अभियान’ कार्यक्रमाच्या प्रसंगी दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते.

सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील (BJP MP Sanjaykaka Patil ) भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगू लागल्या आहेत. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या दौर्‍यात खासदार संजयकाका हे अनुपस्थित राहिले याचीसुद्धा अनेक उदाहरण आहेत. मात्र जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दौर्‍याच्यावेळी खासदार संजयकाका पाटील आवर्जून उपस्थित राहतात.

आज सुद्धा सांगलीतील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार संजयकाका पाटील एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. स्टेजवर आवर्जून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील यांना आपल्या जवळ बोलवून बसवलं. आणि या दोन नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा सुरू होती. यापूर्वी सुद्धा एका बंद खोलीतून दोन नेते एकत्र बाहेर आले होते.

व्यासपीठावर लांब बसतो म्हणणाऱ्या भाजप खासदार संजय काका पाटील यांना मंत्री जयंत पाटील यांनी जवळ बोलावून आग्रहाने जवळ बसवले. संजय काका नको म्हणत असताना जवळ बसवून घेतले.

कोण आहेत संजय काका पाटील?

2014 साली संजयकाका पाटील भाजपमधून लोकसभेवर 2 लाख 38 हजार मतांनी निवडून गेले होते. त्यांनी काँग्रेस नेते आणि तत्कालिन केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचा पराभव केला होता. संजयकाका पाटील दिवंगत आर आर पाटील यांच्या नेतृत्वाच सांगलीमध्ये काम करत होते. मात्र 2014 साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम करत भाजपात प्रवेश केला होता. दिवंगत आर आर आबांचे ते पक्षांअंतर्गत शत्रू मानले जात होते. त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

  • संजय काका पाटील सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
  • 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत ते भाजपकडून निवडून आले आहेत
  • बेधडक आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे
  • संजयकाका पाटील यांनी काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली.
  • काँग्रेसमधून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीमधून ते विधानपरिषदेचे आमदार झाले
  • पुढे राष्ट्रवादीला राम राम ठोकून त्यांनी भाजपचं उपरणं गळ्यात घातलं.

VIDEO 

(BJP MP Sanjaykaka Patil attended NCP Jayant Patil program at sangli)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.