आर.आर. पाटलांचा कडवा विरोधक, वसंतदादांच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवणारा नेता; कोण आहेत संजयकाका पाटील?

MP Sanjay Patil | माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख निर्माण झालेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात संजयकाका पाटील यांनी कमळ फुलवून दाखवले होते. नंतरच्या काळात संजयकाका पाटील यांनी जिल्हापरिषद, महापालिका, पंचायत समित्या आणि नगरपरिषदांमधील काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आणली होती.

आर.आर. पाटलांचा कडवा विरोधक, वसंतदादांच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवणारा नेता; कोण आहेत संजयकाका पाटील?
संजय पाटील, भाजप खासदार
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 7:57 AM

मुंबई: गेल्या काही वर्षांमध्ये सांगली जिल्ह्यात आपले राजकीय वर्चस्व निर्माण करणारे खासदार संजयकाका पाटील आजघडीला प्रमुख भाजप नेत्यांपैकी एक आहेत. 2014 मध्ये भाजपकडून लोकसभेवर निवडून गेलेल्या संजयकाका पाटील यांनी गेल्या सात वर्षांच्या काळात जिल्ह्यात पद्धतशीरपणे स्वत:चा जम बसवला आहे. आजघडीला सांगलीतील प्रत्येक तालुक्यात संजयकाका पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख निर्माण झालेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात संजयकाका पाटील यांनी कमळ फुलवून दाखवले होते. नंतरच्या काळात संजयकाका पाटील यांनी जिल्हापरिषद, महापालिका, पंचायत समित्या आणि नगरपरिषदांमधील काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आणली होती. त्यामुळे सांगलीच्या राजकारणात संजय पाटील यांचा दबदबा निर्माण झाला आहे.

कोण आहेत संजयकाका पाटील?

संजयकाका पाटील यांचा जन्म 4 जानेवारी 1965 रोजी सावर्डे येथे झाला. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सांगलीतील वेलिंग्टन महाविद्यालयातून इंटरमिजिएटपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. सांगली जिल्ह्यात त्यांची ओळख दिवंगत आर. आर. पाटील यांचे कडवे विरोधक अशी होती.

संजयकाका पाटील यांचा राजकीय प्रवास

संजय पाटील यांनी 1996 साली युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणाला सुरुवात केली. ते युवक काँग्रेसचे सांगली जिल्ह्यातील अध्यक्ष होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले. 1995 साली विरोधी पक्षात असताना संजयकाका पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सातत्याने आवाज उठवून शिवसेना-भाजप युती सरकारला भंडावून सोडले होते. 1999 साली संजयकाका पाटील यांनी काँग्रेसच्या तिकीटावर कंवठे-महाकाळ मतदारसंघातून माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला.

2004 च्या विधानसभा निवडणुकीत संजयकाका पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आर.आर. पाटलांना पुन्हा एकदा आव्हान दिले. मात्र, या निवडणुकीतही आबांनी बाजी मारली. नंतरच्या काळात संजयकाका पाटील राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना विधानपरिषदेवर पाठवण्यात आले.

काही काळ राष्ट्रवादीत काढल्यानंतर 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना थेट खासदारकीची उमेदवारी दिली. भाजपचा हा विश्वास सार्थ ठरवत संजयकाका पाटील यांनी वसंतदादा पाटलांचे नातू आणि काँग्रसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा 2,38,000 मतांनी पराभव केला. नंतरच्या काळात त्यांनी सांगली जिल्ह्यात भाजप पक्षाचा आणखी विस्तार केला. त्यामुळे 2019 मध्ये भाजपकडून पुन्हा एकदा संजयकाका पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीतही त्यांनी स्वाभिमानीच्या विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांना पराभवाची धूळ चारली.

जयंत पाटलांशी विशेष सख्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यातील सख्य हे कायमच चर्चेचा विषय असतो. अलीकडे एका कार्यक्रमात जयंत पाटील यांनी आग्रहाने संजयकाका पाटील यांना आपल्या जवळ बसवून घेतले होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली होती. त्यामुळे संजयकाका पाटील भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीशी जवळीक वाढत असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. राष्ट्रवादीशी जवळीक नाही, पण गट-तट, पक्ष हा मुद्दा बाजूला ठेवून चांगल्या कार्यक्रमांना उपस्थित राहतो. मी भाजपातून बाहेर जावं, असं कोणी म्हणत असेल, तर त्यांच्या तोंडाला हात लावू शकत नाही, असे संजयकाका यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

संजयकाका म्हणाले, नको नको नको, जयंत पाटलांनी आग्रहाने शेजारी बसवलं

Sangli | सांगलीत जयंत पाटील-संजयकाका पाटील एकाच मंचावर

‘जुन्या मित्रांची यारी, राजकारणातली दुनियादारी’, भाजप खासदार संजयकाका पाटलांच्या मनात नेमकं काय?

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.