आता एक पक्ष नाराज, पुढच्या काळात सर्वच पक्षांची नाराजी बाहेर येईल, सुजय विखेंची भविष्यवाणी

पुढच्या काळात सर्वच पक्षाची नाराजी बाहेर येईल, अशी भविष्यवाणी सुजय विखेंनी केली. (BJP MP Sujay Vikhe Patil Criticizes Congress)

आता एक पक्ष नाराज, पुढच्या काळात सर्वच पक्षांची नाराजी बाहेर येईल, सुजय विखेंची भविष्यवाणी
Follow us
| Updated on: Aug 26, 2020 | 9:39 AM

अहमदनगर : “काँग्रेस चौथ्या नंबरचा पक्ष असून त्यांना लॉटरी लागली आहे. मात्र तरीही त्यांचे तिकीट कोणी फाडत नाही,” असा टोला भाजपचे खासदार सुजय विखे यांनी लगावला आहे. “आता एका पक्षाची नाराजी बाहेर आली आहे. मात्र पुढच्या काळात सर्वच पक्षाची नाराजी बाहेर येईल,” अशी भविष्यवाणी विखेंनी केली. (BJP MP Sujay Vikhe Patil Criticizes Congress)

“काँग्रेस हा चौथ्या नंबरचा पक्ष असून त्यांना लॉटरी लागली. मात्र लॉटरी लागूनही त्याचे तिकीट कोणी फाडत नाही,” असा टोला विखेंनी लगावला आहे. तसेच “तीन पक्षांच्या सरकारमध्ये सर्वांचं समाधान करणे अवघड असते. तसेच ज्या खात्याचा मंत्री त्याच पक्षाचे काम होते. त्यामुळे बाकीचे नाराज होतात,” असेही सुजय विखे म्हणाले.

“महाराष्ट्राचा विकास थांबेल त्यांचा जो काही अंतर्गत प्रश्न आहे तो त्यांनी सोडवून घ्यावा. हे सर्व स्वार्थासाठी एकत्र आले आहे. मंत्री समाधानी आहेत. मात्र आमदार नाराज आहे. तसेच आता एका पक्षाची नाराजी बाहेर आली आहे. मात्र पुढच्या काळात सर्वच पक्षाची नाराजी बाहेर येईल,” अशी भविष्यवाणी खासदार सुजय विखे यांनी केली आहे.

त्याचबरोबर मी कोरोना रोखण्यासाठी जिल्ह्यात फिरत आहे. काही ठिकाणी बैठका घेतल्या. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र जर माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर मी तयार आहे.

“पण माझ्या एकट्यावरच नव्हे तर पारनेरमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोविड सेंटरचं उद्घाटन केलं. त्यांच्यासह या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या 300 लोकांवरही गुन्हे दाखल करा,” अशी मागणी खासदार विखेंनी केली. (BJP MP Sujay Vikhe Patil Criticizes Congress)

संबंधित बातम्या : 

रिक्षाप्रमाणे तीन‌ चाकी सरकार चालणंही अवघड, सुजय विखे पाटलांचा महाविकास आघाडीला टोला

ट्विटरवर मागणी आणि ट्विटरवर फॉलोअप, मनसे आमदारांनी एकदा शीळ फाट्यावर फेरफटका मारावा : खा. श्रीकांत शिंदे

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.