फडणवीसांनी करुन दाखवलं, पण त्याला नावं ठेवली, सत्तेत आहात तर करुन दाखवा, उदयनराजे आक्रमक

कोरोना आहे, लोकं शांत आहेत, कितीवेळ शांत राहतील, असा इशाराही उदयनराजेंनी दिला आहे. (BJP MP UdayanRaje Criticizes Maha Vikas Aaghadi) 

फडणवीसांनी करुन दाखवलं, पण त्याला नावं ठेवली, सत्तेत आहात तर करुन दाखवा, उदयनराजे आक्रमक
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 1:18 PM

सातारा : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी करुन दाखवलं. पण त्यांना नाव ठेवली. मग आता तुम्ही सत्तेत आहात ना, तर मग ते करुन दाखवा, अशी आक्रमक भूमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली. नुकतंच साताऱ्यात  मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला. (BJP MP UdayanRaje Criticizes Maha Vikas Aaghadi)

ज्यांनी निवडून दिलं. ती लोक तुम्हाला खाली खेचू शकता. वयाचा आदर आहे. कोणाला नाव घेऊन मोठं करणार नाही. यात सर्वच दोषी आहेत. करायचं तर हो म्हणा, नाहीतर लोक तुम्हाला रस्त्याने फिरु देणार नाही. कोरोना आहे, लोकं शांत आहेत, कितीवेळ शांत राहतील, असा इशाराही उदयनराजेंनी दिला आहे.

अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन होणारच. पण जर तो उद्रेक घडला तर त्याला जबाबदार कोण? जे काही नुकसान होईल त्याला ही लोक जबाबदार असतील. निवडणुका आल्यावर आश्वासन द्यायचं. करणार, झालं, झाल्यात जमा आहे, पण कधी. आणि दुसऱ्यांना नाव ठेवायची. निदान थोडी तर लाज बाळगा. जातीचा राजकारण करण्यापेक्षा मेहरबानी करुन राजीनामा द्या आणि घरी बसा, अशी टीका उदयनराजेंनी केली.

देवेंद्र फडणवीस आपल्या वयाचे, त्यांनी आरक्षण टिकवलं 

जाती जातीत तेढ निर्माण करु नका. राजकारण करुन तेवढीच वेळ मारुन न्यायची आणि फक्त राजकारण करायचं. शेवटी विचार करणं गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस हे आपल्याचं वयाचे आहेत. त्यांनी आरक्षण टिकवले. त्यासाठी पुढाकार घेतला. तरीही त्याला तुम्ही नाव ठेवता. सत्तांतर झालं. तुम्ही सत्तेत आला. पण तुम्ही ते का नेलं नाही. उलट तुम्ही वकीलाला गायब केलं आहे, असा टोलाही उदयनराजेंनी लगावला.  (BJP MP UdayanRaje Criticizes Maha Vikas Aaghadi)

एवढा मोठा प्रश्न आहे. तरी  मराठा समाजाला किरकोळ करता. मराठा समाजाला विसरुन चालणार नाही. हा महाराष्ट्र आहे. जसे इतर जातीतील लोक आहेत, तसेच मराठाही सुद्धा एक जात आहे. ती निर्णायक जात आहे, असेही उदयनराजे म्हणाले.

मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढा

माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की मराठा आरक्षण हा मुद्दा तुम्ही निकाली काढा. माझा कोणावरती रोख नाही, मराठा आरक्षण मिळाला पाहिजे. माझा कोणी शत्रू नाही, पवार साहेब असतील, आणखी कोणी असतील, ते वयाने मोठे आहेत. ज्यांनी तुम्हाला मान दिला, तुम्हाला संपूर्ण सन्मान केला. त्या योग्यतेचे ठरवलं. तुमच्यावर विश्वास ठेवला. मात्र तुम्ही त्यांचा विश्वास उडवला आहे, असेही उदयनराजेंनी सांगितले.  (BJP MP UdayanRaje Criticizes Maha Vikas Aaghadi)

संबंधित बातम्या : 

मंडल आयोग लागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही; उदयनराजेंचा सवाल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.