Maharashtra politics: …तर लोकशाही कशी जिवंत राहणार?, भाजपाला अटलजींच्या विचारांची गरज; ‘सामना’मधून पुन्हा टीकेचे बाण

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधण्यात आला आहे. भाजपाला अटलजींच्या विचाराची गरज असल्याचे म्हटले आहे.

Maharashtra politics: ...तर लोकशाही कशी जिवंत राहणार?, भाजपाला अटलजींच्या विचारांची गरज; 'सामना'मधून पुन्हा टीकेचे बाण
संजय राऊत Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 7:21 AM

मुंबई : शिवेसेनेचे (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून पुन्हा एकदा भाजप आणि बंडखोर आमदारांवर टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात एक सोनेरी पान लिहिले गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एका क्षणात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनाही काही काळ थांबून विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गोंधळ निर्माण करून काही आमदारांचे निलंबन घडवून ते सरकार वाचवू शकले असते. पण त्यांनी तो मार्ग निवडला नाही, व आपल्या स्वभावाला साजेशी भूमिका घेतली. त्यांनी आधीच वर्षा बंगला सोडला होता, त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. या सर्व पार्श्वभूमीवर अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची दोन महत्त्वाची विधाने आठवतात. अटलजींचे सरकार फक्त एका मताने कोसळत असतानाही अटल बिहारी विचलित झाले नाहीत. तोडफोड करून मिळालेल्या बहुमतास मी चिमट्यानेही शिवणार नाही” असे त्यांनी म्हटले होते. पण त्यांनी पुढे जे सांगितले त्याची नोंद आजच्या भाजप नेत्यांनी घेणे गरजेचे आहे. ते लोकसभेच्या सभागृहात म्हणाले ”मंडी सजी हुई थी, माल भी बिकने केलिए तैयार था, लेकिन हमने माल खरीदना पसंद नही किया था!” अटलजींचा हा वारसा आज संपला आहे, असा घणाघात सामनाच्या संपादकीयमधून करण्यात आला आहे.

बंडखोरांच्या सुरक्षेसाठी सैन्य मैदानात

पुढे सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातले आमदार आधी सुरतला नेले. तेथून त्यांना आसामला हलवले. आता ते गोव्यात आले व त्यांचे स्वागत भाजपवाले मुंबईत करीत आहेत. देशाच्या सीमेच्या रक्षणासाठी असलेले हजारो जवान खास विमानाने मुंबईच्या विमानतळावर उतरले. इतका बंदोबस्त केंद्र सरकार ठेवत आहे तो कोणासाठी? ज्या पक्षाने जन्म दिला त्या पक्षाशी, हिंदुत्वाशी, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी द्रोह करणाऱ्या आमदारांच्या संरक्षणासाठी? असा सवाल देखील सामनामधून उपस्थित करण्यात आला आहे. हिंदुस्थानसारख्या महान देशाला आणि त्या महान देशाच्या घटनेला नैतिक ऱ्हासाने ग्रासून टाकले आहे. या परिस्थितीत नजीकच्या भविष्यकाळात तरी बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत कारण बाजारात सर्वच रखवालदार विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

हे सुद्धा वाचा

…तर लोकशाही कशी जिवंत राहणार?

सामनाच्या संपादकीयमधून मोदींवर देखील टीका करण्यात आली आहे. जगभरात लोकशाहीचा डंका वाजवत फिरायचे आणि आपल्याच लोकशाही व व्यक्तिस्वातंत्र्याच्या दिव्याखाली अंधार, अशी सध्याची स्थिती आहे, विरोधी पक्षाचे अस्तित्व संपवून या देशात लोकशाही कशी जिवंत राहणार? शिवसेनेचे आमदार फुटावेत यासाठी कोणत्या महाशक्ती प्रयत्न करीत होत्या हे मुंबईत उतरविलेल्या सैन्याने उघड केल्याचे सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.