रोहित पवारांनी नकलीपणा केला, कथित पुराव्यासह निलेश राणेंचा हल्ला
केंद्राच्या कृषी कायद्यांवरुन भाजप नेते निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.
मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्यांवरुन भाजप नेते निलेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांना समजून घेण्यात कमी पडतंय, अशी टीका रोहित पवार यांनी केली होती. आता निलेश राणेंनी ट्विट करुन रोहित यांच्यावर पलटवार केला आहे. (BJP Nilesh Rane Slam Rohit Pawar Over Agriculture Law)
“शेतकरी आंदोलनावर भाष्य करुन एकीकडे शेतकऱ्यांना भडकवायचं आणि दुसरीकडे तुमच्याच कंपनीने कंत्राटी शेतीचे फायदे सांगायचे. नकलीपणा काय असतो हे बघा आता”, अशा शब्दात निलेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधलाय.
“नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत”, असं म्हणत रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोचा फ्लेक्स निलेश राणे यांनी ट्विट केलाय.
नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत. pic.twitter.com/dIx5fEhEcx
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 24, 2021
रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोच्या फ्लेसमध्ये काय म्हटलंय…?
करार पद्धतीने शेती करण्याचे फायदे वर्षभर हमी भावाने खरेदी शेतकऱ्याला क्रेडिटवर बेबीकॉर्न बियाणे आणि मिरचीच्या रोपांची पुरवठा शून्य टक्के वाहतूक विविध पिकांसाठी तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन
केंद्राच्या कृषी कायद्यांवरुन देशभरात सध्या गदारोळ सुरु आहे. पारित केलेले कायदे रद्द केले जावेत, यासाठी राजधानी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे तर इकडे मुंबईतही शेकडो किलोमीटर अंतर चालून शेतकऱ्यांचा लाल जथ्था राजभवनावर धडकणार आहे. मुंबईच्या या मोर्चाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दिला आहे किंबहुना आज ते मोर्चाच्या ठिकाणी स्वत: उपस्थिती लावणार आहेत.
शेतकऱ्यांचा आक्रोश….
अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा रविवारी रात्री मुंबईत दाखल झाला आहे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून हे शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. आज 25 जानेवारीला हा मोर्चा राजभवनावर धडकणार आहे. केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 60 दिवसांपासून दिल्लींच्या वेशींवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने या महामोर्चात सहभागी झालेले आहेत.
हे ही वाचा :
LIVE | कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच, शेतकऱ्यांची दिशाभूल केली जातेय – फडणवीस
मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये; पवारांनी दिलं ‘हे’ कारण!