BMC: मुंबई महापालिकेच्या कॉम्प्युटर खरेदीवर भाजपचा आक्षेप, निविदा तात्काळ रद्द करण्याची मागणी

जे कॉम्प्युटर 85 हजार रुपयाला ही कंपनी देणार आहे. त्याची प्रत्यक्षात किंमत कमी अत्यंत कमी आहे. सर्व खरेदीत मोठा घोटाळा होऊ शकतो. म्हणून ही निविदा पालिकेने थांबवावं अशी मागणी भाजप माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केलीय.

BMC: मुंबई महापालिकेच्या कॉम्प्युटर खरेदीवर भाजपचा आक्षेप, निविदा तात्काळ रद्द करण्याची मागणी
मुंबई पालिकेच्या कॉम्प्युटर खरेदीवर भाजपचा आक्षेप, निविदा तात्काळ रद्द करण्याची मागणी
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 9:18 AM

मुंबई : महापालिका आयुक्तांना 25 कोटी रुपयांच्या वाढीव किमतीच्या संगणक (Computer) खरेदीची निविदा (Tender) तात्काळ रद्द करून जीईएम टेंडरद्वारे मागवावी अशी भाजपकडून मागणी केली आहे. काही विक्रेत्यांनी एमसीजीएमच्या आयटी विभागाकडून हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या खरेदीची मक्तेदारी केली आहे. तेच फक्त या निविदांसाठी बोली लावण्यास पात्र असतात असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड हा संगणक हार्डवेअरच्या पुरवठ्यासाठी असाच एक प्राधान्य असलेला विक्रेता आहे असाही आरोप भाजपकडून (BJP) करण्यात आला आहे.

2018-2019 या आर्थिक वर्षासाठी 100 कोटी रुपयांच्या उलाढालीची अट

मागच्या काही दशकांपासून असे आढळून आले आहे की, एमसीजीएमला या विक्रेत्याकडून आयटी हार्डवेअरसाठी सर्व निविदांपैकी 80 टक्के निविदा एकाच कंपनीला प्राप्त झाल्या आहेत.आयटी विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यातील संगनमत एवढी मजबूत आहे की, 25 कोटी रुपयांच्या संगणक खरेदीसाठी महापालिकेने 2018-2019 या आर्थिक वर्षासाठी 100 कोटी रुपयांच्या उलाढालीची अट निविदेत घातली आहे. या अटी सीवीसी नियमांचे आणि एसबीडीच्या निर्देशांचे स्पष्ट उल्लंघन करत आहेत.

हे सुद्धा वाचा

कॉम्प्युटर 85 हजार रुपयाला ही कंपनी देणार आहे

जे कॉम्प्युटर 85 हजार रुपयाला ही कंपनी देणार आहे. त्याची प्रत्यक्षात किंमत कमी अत्यंत कमी आहे. सर्व खरेदीत मोठा घोटाळा होऊ शकतो. म्हणून ही निविदा पालिकेने थांबवावं अशी मागणी भाजप माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केलीय. पालिका निवडणूक जवळ आल्यापासून भाजपकडून शिवसेनेला टार्गेट करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात दोन पक्षांमधला मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढच्या काही दिवसात आणखी अशी प्रकरणं भाजरप बाहेर काढण्याची शक्यता आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.