महाजनांच्या बालेकिल्ल्याला खडसेंचा सुरुंग, जामनेरमधील ‘दोन बसभर’ भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत

खडसेंच्या मुक्ताईनगरमधील फार्म हाऊसवर गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील भाजपच्या 200 कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला

महाजनांच्या बालेकिल्ल्याला खडसेंचा सुरुंग, जामनेरमधील 'दोन बसभर' भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 2:43 PM

जळगाव : राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडून भाजपला हादरे सुरुच आहेत. भाजपचे ‘संकटमोचक’ नेते अशी ओळख असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात खडसेंनी सुरुंग लावला. जामनेरमधील ‘दोन बस’ भरुन भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. (BJP officials from Girish Mahajan’s Jamaner Constituency joins NCP in presence of Eknath Khadse)

गेल्या काही दिवसांपासून भाजपमधून राष्ट्रवादीत पदाधिकारी-कार्यकर्त्यांचं आऊटगोइंग सुरु झालं आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील भाजपचे दोनशेहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला. एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला

दोन लक्झरी बसेस भरुन भाजप कार्यकर्ते पक्षप्रवेशाच्या सोहळ्यासाठी दाखल झाले होते. खडसेंच्या मुक्ताईनगरच्या फार्म हाऊसवर गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील भाजपच्या 200 कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, राष्ट्रवादीचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यावेळी उपस्थित होत्या.

गिरीश महाजन आणि खडसेंमध्ये शाब्दिक युद्ध

फडणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उदयाला आले. देवेंद्र फडणवीस यांनी नियोजनपूर्वक रसद पुरवून गिरीश महाजन यांना जिल्ह्यात मोठे गेले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन अशी दोन शक्तीकेंद्रे उभी झाली होती. आता एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

“भाजपला ताकद दाखवून देतो”

“आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल, अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी कालच केली होती. जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावाही एकनाथ खडसे यांनी केला होता.

जळगावात भाजपच्या 60 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरु झाल्याचे चित्र आहे.

संबंधित बातम्या :

आता भाजपला ताकद दाखवतो, उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी; एकनाथ खडसेंची गर्जना

भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही; महाजनांचा खडसेंना टोला

खडसेंच्या बालेकिल्ल्यातील भाजपच्या पक्षबांधणी बैठकीचा उडाला फज्जा; कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

(BJP officials from Girish Mahajan’s Jamaner Constituency joins NCP in presence of Eknath Khadse)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.