अस्वस्थता उफाळणार की संयम झळकणार? पंकजा मुंडे उद्या पाथर्डीच्या दौऱ्यावर, मौन सुटण्याच्या प्रतीक्षेत अवघा महाराष्ट्र !

संधी डावलल्यानंतर अनेकांनी आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. शिवसेना आणि एमआयएमनं सहानुभूतीही दाखवलीय. पण पंकजांनी मौनातून अजूनही संयम बाळगलाय. उद्याच्या कार्यक्रमातही हा संयम दिसून आला तर हे उत्तम राजकारण्याचं लक्षण ठरेल, असं म्हणणारा एक गट आहे.

अस्वस्थता उफाळणार की संयम झळकणार? पंकजा मुंडे उद्या पाथर्डीच्या दौऱ्यावर, मौन सुटण्याच्या प्रतीक्षेत अवघा महाराष्ट्र !
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 3:53 PM

अहमदनगरः विधान परिषद निवडणुकीची (MLC Election) उमेदवारी डावलण्यात आल्यानंतर मौनात गेलेल्या पंकजा मुंडे उद्या प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. भाजपने निवडणुकीसाठी उभ्या केलेल्या पाच उमेदवारांमध्ये पंकजा मुंडेेंचं (Pankaja Munde) नाव असण्याची दाट शक्यता होती. संधी मिळाली तर त्याचं सोनं करेन, असं वक्तव्यही पंकजांनी केलं होतं. पण नाव बाद झालं आणि पंकजा मौनात गेल्या. त्यानंतर थेट विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतरच उद्या पंकजा मुंडे महाराष्ट्रात जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावतील. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीमध्ये (Patherdy) त्यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. पंकजांची उमेदवारी डावलण्यात आल्यानंतर शेकडो समर्थकांनी नाराजी बोलून दाखवली. काहींनी निदर्शनं केलं, रास्ता रोको केलं तर काहींनी सोशल मीडियातून धुसपूस बोलून दाखवली. पाथर्डीच्या एका कार्यकर्त्यानं तर थेट विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परळीप्रमाणेच पाथर्डीमध्ये मुंडे समर्थकांचा मोठा वर्ग आहे. पाथर्डी दौऱ्यावर आलेल्या पंकजा मुंडे विष प्राशन केलेल्या कार्यकर्त्याला भेटतील. यावेळी मोहटा देवीचंही दर्शन घेतील.

पंकजांच्या स्वागताची जय्यत तयारी

पंकजा मुंडे यांच्या मंगळवारच्या दौऱ्यासाठी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पाथर्डी शहरात 20 कमानी तर 50 पेक्षा जास्त फ्लेक्स बोर्ड लागले आहेत. उद्याच्या दौऱ्यासाठी समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. पाथर्डीतील विषारी औषध घेणारा समर्थक मुकुंद गर्जे याची भेट पंकजा घेतील. तसेच मोहटादेवीचंही दर्शन घेतील. मंदिर परिसरातही पंकजांच्या स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे.

अस्वस्थता उफाळणार?

विधान परिषदेची उमेदवारी डावलण्यात आल्यानंतर पंकजा मुंडे प्रथमच जाहीर कार्यक्रमात सहभागी होत आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळाल्यामुळे पंकजा मुंडे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील फार कमी कार्यक्रमात हजेरी लावत आहेत. विधान परिषदेच्या निमित्ताने तरी त्यांना महाराष्ट्रातील सक्रिय राजकारणात येण्याची संधी होती. मात्र तीदेखील डावलण्यात आल्याने पंकजांचे समर्थक प्रचंड अस्वस्थ आहेत. त्यांची नाराजी अनेक निदर्शनांमधून व्यक्त होतेय. पण पंकजांनी घेतलेलं मौन अद्याप सुटलेलं नाही. उद्याच्या कार्यक्रमात त्यांना माध्यमांसमोर प्रतिक्रिया द्यावीच लागणार आहे. यावेळी त्यांची अस्वस्थता उफाळून येणार का, अशी चर्चा केली जातेय.

..की संयमच बाळगणार?

हीच नव्हे तर याआधीही पंकजा मुंडेंना अनेक संधी नाकारण्यात आल्या आहेत. खरं तर जनतेच्या मनातील पहिल्या महिला मुख्यमंत्री, असं त्यांना म्हटलं जातं. याच पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत प्रखर विरोधक आणि तगडी आव्हानं असताना पंकजा मुंडे अत्यंत संयमानं व्यक्त होत असतात. यंदाची संधी डावलल्यानंतर अनेकांनी आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. शिवसेना आणि एमआयएमनं सहानुभूतीही दाखवलीय. पण पंकजांनी मौनातून अजूनही संयम बाळगलाय. उद्याच्या कार्यक्रमातही हा संयम दिसून आला तर हे उत्तम राजकारण्याचं लक्षण ठरेल, असं म्हणणारा एक गट आहे. तर अस्वस्थता बोलून दाखवली तर महाराष्ट्रात नक्की राजकीय भूकंपाची शक्यता आहे, असं म्हणणाराही एक वर्ग आहे. पाहुयात उद्या काय होतंय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.