AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shevgaon Vidhan Sabha 2024 : मोनिका राजळे यांना मोठा धक्का, शेवगाव पाथर्डी मतदार संघात भाजपला मोठं खिंडार

Shevgaon Vidhan Sabha Election 2024 : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या शेवगाव पाथर्डी विधासभा मतदारसंघात भाजपासमोर आव्हान निर्माण झालं आहे. भाजपाने इथून तिसऱ्यांदा मोनिका राजळे यांना उमेदवारी दिली आहे.

Shevgaon Vidhan Sabha 2024 : मोनिका राजळे यांना मोठा धक्का, शेवगाव पाथर्डी मतदार संघात भाजपला मोठं खिंडार
Monica Rajale
Follow us
| Updated on: Oct 23, 2024 | 3:00 PM

शेवगाव पाथर्डी विधासभा मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. शेवगाव पाथर्डी विधासभा मतदारसंघ अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. भाजपाने या मतदारसंघातून विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जिल्हा भाजपामध्ये असंतोष उफाळून आला आहे. ओबीसी जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड, तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा शितल केदार आणि भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप फुंदे, भाजपा विद्यार्थी आघाडीचे शहराध्यक्ष गणराज पालवे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला राम राम केला आहे.

पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देत नाही तर पक्षाचे वरिष्ठ नेते भेटण्यास वेळ देत नसल्याची खंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौंड यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे

अंतर्गत बंडाळीला सुरुवात

निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याची पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. गोकुळ दौंड लढणार अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. मोनिका राजळे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत बंडाळीला सुरुवात झाली. मोनिका राजळे या सलग दोन टर्मपासून आमदार आहेत. मोनिका राजळे 2014 साली पहिल्यांदा मोदी लाटेत भाजपाच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या चंद्रशेखर घुले यांचा पराभव केला. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांनी दुसऱ्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. आता पक्षाने 2024 मध्ये पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.