बाळासाहेबांच्या आदर्शाला जे जिवंत ठेऊ शकले नाहीत, त्यांच्याविषयी काही बोलायचे नाही, भाजपची टीका
जे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शाला जिवंत ठेऊ शकले नाहीत. त्यांच्याविषयी आम्हाला काहीही बोलायचे नाही. असा घणाघात भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी (BJP Press Conference criticizes shivsena) केली.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्रीत भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ (BJP Press Conference criticizes shivsena) घेतली. यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्व पक्षांनी पत्रकार परिषद घेत आपपल्या भूमिका मांडल्या. त्यानंतर नुकतंच भाजपची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली (BJP Press Conference criticizes shivsena) होती. या पत्रकार परिषदेत भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करण्यात (BJP Press Conference criticizes shivsena) आली .
“जे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शाला जिवंत ठेऊ शकले नाहीत. त्यांच्याविषयी आम्हाला काहीही बोलायचे नाही.” असा घणाघात भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी (BJP Press Conference criticizes shivsena) केली. “अनेकजण लोकशाहीची हत्या झाल्याचे बोललं जात होते. जेव्हा शिवसेना स्वार्थासाठी भाजपसोबतची 30 वर्षाची युती तोडते आणि विरोधकांसोबत जाते. तेव्हा ती लोकशाहीची हत्या होत नाही का?” असा प्रश्नही रविशंकर प्रसाद यांनी (BJP Press Conference criticizes shivsena) विचारला.
“शिवसेनेला निवडून आणण्यासाठी भाजपच्या अनेक समर्थकांनी मदत केली. शिवसेनेचे अनेक उमेदवार भाजपमुळे निवडून आले होते. निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेला बहुमत मिळाले. मात्र निकाल आल्यानंतर शिवसेना कोणाच्या इशाऱ्यावर नाचत होती.” असेही ते म्हणाले.
“निकालानंतर शरद पवार आणि काँग्रेसने अनेकदा आम्हाला जनतेने विरोधात बसायचा कौल दिला आहे, असे सांगत होते. काँग्रेसही हेच सांगत होती. पण मग नंतर हे तिघेही खुर्चीसाठी एकत्र आले. ही निव्वळ मॅच फिक्सिंग आहे, फक्त आणि फक्त खुर्ची मिळवण्यासाठी,” असेही रविशंकर प्रसाद म्हणाले.
“भाजप आणि राष्ट्रवादी ही नवीन युती बनली ही स्थायी आणि प्रामाणिक सरकार देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काही लोक चोर दरवाजाने भारताच्या आर्थिक राजधानीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे त्यांचे षडयंत्र आहे.” अशी टीकाही भाजपच्या पत्रकार परिषदेत करण्यात (BJP Press Conference criticizes shivsena) आली.
“सत्तेसाठी एकत्र येणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने गप्पा मारु नये,” अशी टीकाही भाजपने शिवसेनेवर केली.
“राज्यपालांनी तिन्ही पक्षांना बोलवलं होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला बोलवल्यानंतर त्यांनी राज्यपालांकडे वेळ मागितला. मात्र आज सकाळी भाजपने अजित पवारांसोबत मिळून राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र दिले.” असेही त्यांनी सांगितले.
“शरद पवार काय बोलतात किंवा शिवसेना आणि काँग्रेस काय बोलते यावर मला काहीही बोलायचे नाही असेही ते म्हणाले. शिवसेना-भाजपला जनतेने बहुमत दिले. मात्र असे असूनही शिवसेना-भाजप बहुमत देऊनही सरकार का बनवत नाही असा प्रश्न महाराष्ट्राची जनता विचारत आहे.” असेही रविशंकर प्रसाद (BJP Press Conference criticizes shivsena) म्हणाले.
“आम्ही एक प्रामाणिक आणि ईमानदार शासन देणार, हे आमचे आश्वासन आहे. ज्या प्रकारचे शब्द पंतप्रधान मोदी आणि अमित शाहा यांच्याविषयी वापरले गेले. ते आम्ही सहन करणार नाही. ते फक्त आम्ही रेकॉर्ड केले आहे.” असेही रविशंकर प्रसाद म्हणाले.
संबंधित बातम्या :
अजित पवारांकडून राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांचं पाठिंबा पत्र मिळालं, गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट