सत्तेच्या लालसेतून शिवसेनेकडून धोका, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार नव्हे, सर्कस : राजनाथ सिंह

"महाराष्ट्र सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. असं वाटतं की सरकारच्या नावाखाली 'सर्कस' होत आहे" अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली. (Rajnath Singh on Shivsena)

सत्तेच्या लालसेतून शिवसेनेकडून धोका, महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार नव्हे, सर्कस : राजनाथ सिंह
Follow us
| Updated on: Jun 09, 2020 | 8:11 AM

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी अभिनेता सोनू सूदवर ‘सामना’तून झालेल्या टीकेवरुन शिवसेनेवर शरसंधान साधले. तसेच, सत्तेच्या लालसेतून शिवसेनेने धोका दिला, आता महाराष्ट्रात सरकार नसून सर्कस सुरु असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली. (Rajnath Singh criticises Shivsena and Maharashtra Government)

राजनाथ सिंह यांनी सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र जनसंवाद रॅलीला संबोधित केले. यावेळी राजनाथ सिंह यांनी सोनू सूदचेही कौतुक केले. ‘मी टीव्हीवर पाहिले की अभिनेता सोनू सूद या संकटात अडकलेल्या कामगारांना मदत करत आहे. पण संकटात अडकलेल्या मजुरांना मदत करणार्‍या व्यक्तीवर काही जण टीका करत आहेत.’ असा निशाणा राजनाथ सिंह यांनी साधला.

“महाराष्ट्र सरकार हे तीन पक्षांचे सरकार आहे. असं वाटतं की सरकारच्या नावाखाली ‘सर्कस’ होत आहे. महाराष्ट्र शासनाकडे ज्या प्रकारची दूरदृष्टी असायला हवी, तीच दिसत नाही” अशी टीका त्यांनी केली.

(Rajnath Singh criticises Shivsena and Maharashtra Government)

राजनाथ सिंह यांनी शिवसेनेला युती तोडल्याबद्दल कडाडून टोला लगावला “जेव्हा निवडणुका लढल्या गेल्या, तेव्हा भाजपशी शिवसेनेने युती केली. पण युतीनंतर सत्तेच्या लालसेतून भाजपला धोका दिला. मला विश्वास नाही बसत ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे” असा घणाघात राजनाथ सिंह यांनी केला.

“काँग्रेस नेते राहुल गांधी सांगतात की आम्ही महाराष्ट्रात सत्तेत आहोत, पण निर्णयात नाही. म्हणजे जेव्हा संकट येते, तेव्हा हे हात झटकतात” अशी टीका राजनाथ यांनी केली.

हेही वाचा : भाजपचे नेते गेल्यानंतर 3 महिने घरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना आणि पवारांना बाहेर पडावंसं वाटलं : चंद्रकांत पाटील

मुंबईतील रुग्णालयांच्या परिस्थितीचा उल्लेख करत राजनाथ सिंह म्हणाले, “काही रुग्णालयांमध्ये जिथे मृतदेह पडलेले आहेत, तिथेच कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार होत आहेत. तिथे सरकार नावाची गोष्ट शिल्लक राहिली नाही का? सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही. कोविडशी लढण्यासाठी आम्ही महाराष्ट्र सरकारला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार आहोत” असे आश्वासन राजनाथ यांनी दिले. (Rajnath Singh criticises Shivsena and Maharashtra Government)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.