ज्यांच्याकडे 40 आमदार त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कात व्हावा; रावसाहेब दानवेंचं अजब लॉजिक

शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात चढाओढ सुरू आहे.

ज्यांच्याकडे 40 आमदार त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कात व्हावा; रावसाहेब दानवेंचं अजब लॉजिक
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 1:50 PM

नवी दिल्ली: शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात चढाओढ सुरू आहे. दोन्ही गटातील हा वाद शिगेला पोहोचलेला असतानाच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे. ज्यांच्याबरोबर ४० आमदार त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा, असं अजब लॉजिक त्यांनी सांगितलं आहे. ज्यांच्याकडे सर्वाधिक खासदार त्यांचा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) अधिकार आहे, असंही गणित दानवेंनी सांगितलं आहे. अमित शाहांमुळे भाजप कार्यकर्त्यांना लढण्याचं बळ मिळेल. उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला. इतकंच नाही तर त्यांनी जनतेलाही धोका दिला. अमित शाह यांनी कोणताही शब्द दिला नव्हता. निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं शिवसेनेनं मतं मागितली. नंतर आम्हाला धोका दिला, असं म्हणत दानवेंनी मनातील खंत बोलून दाखवली.

उद्धव ठाकरे म्हणजे केवळ डायलॉगबाजी!

उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात कामं केली नाहीत. 2 वर्ष मुख्यमंत्री राहिले पण साधं मंत्रालयमध्येही ते गेले नाहीत. अन् आता डायलॅागबाजी करत आहेत. गवताला भाले फुटतील, केसाला भाले फुटतील… काय ती डायलॉगबाजी, असं दानवे म्हणालेत.

बारामतीत भाजपचाच विजय!

2014 ला भाजप लढला तेंव्हा 30 वर्षानंतर एकहाती सत्ता आली. निवडणूक जिंकण्यासाठी जबाबदारी दिली जाते. तशीच बारामतीची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर दिलीय. माझ्यावर पण जबाबदारी दिली आहे. आम्हाला विश्वास आहे की बारामतीही भाजपचा उमेदवार विजयी होईल, असं दानवे म्हणालेत

हे सुद्धा वाचा

शिवसेनेचं चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे. शिंदेगटाने धनुष्यबाणावर दावा केला आहे. तर धनुष्यबाण आमचाच आहे, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं आहे. त्यावर दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचे चिन्ह असल्याशिवाय निवडणूका होणार नाहीत. सुप्रीम कोर्ट योग्य तो निर्णय देईल, असं दानवेंनी म्हटलं.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.