मराठा समाजानं हक्काचं मागितले तर काँग्रेसला राग का येतो? भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकरांचा सवाल
मराठा समाजानं हक्काचं मागितलं तरीही काँग्रेसला राग का येतो, असा सवाल भाजपचे नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलाय.
मुंबई : “मराठा आरक्षणासाठी आता रस्त्यावर उतरले नाही, तर वेळ निघून जाईल असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाजाला सावध केले. हे काँग्रेस पक्षाला सहन झालं नाही. मराठा समाजाचे आरक्षण घालवल्यानंतर आता त्यांनी त्यांच्या हक्काचं मागितलं तरीही काँग्रेसला राग का येतो,” असा सवाल भाजपचे नेते व राज्याचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते संजय लाखे पाटील यांना केला (BJP Sambhaji Patil Nilangekar criticize Congress Sanjay Lakhe Patil over Maratha reservation).
“सामान्य मराठ्यांनी त्यांच्या हक्काचेही मागायचे नाही का?”
संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, “शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे आणि चुकांमुळे मराठा समाजाने आरक्षण गमावलं. ते पुन्हा मिळविण्यासाठी चंद्रकांत पाटील पुढाकार घेत आहेत आणि समाजाला जागृत करत आहेत, तर त्याचा काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांना इतका राग का यावा, हा प्रश्न आहे. चंद्रकांत पाटील सर्वसामान्य मराठा लोकांचे दुःख मांडत आहेत. सामान्य मराठ्यांनी त्यांच्या हक्काचेही मागायचे नाही का, याचे उत्तर संजय लाखे पाटील यांनी द्यावे.”
“कोरोनाबाबत उत्तर प्रदेशसह अन्य कोणतेही राज्य महाराष्ट्राच्या जवळपासही नाही”
“मराठा समाज कोरोनाच्या परिस्थितीत आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्यास उत्तर प्रदेशसारखी स्थिती होईल, ही संजय लाखे पाटील यांनी व्यक्त केलेली भीती निरर्थक आणि हास्यास्पद आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि कोरोना मृत्यू आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्राची स्थिती उत्तर प्रदेशसारखी होण्यासाठी येथील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यू कमी व्हायला हवेत आणि ते शक्य नाही. महाविकास आघाडीच्या अपयशामुळे कोरोनाच्या बाबतीत उत्तर प्रदेशसह अन्य कोणतेही राज्य महाराष्ट्राच्या जवळपासही नाही हे राज्याचे दुर्दैव आहे,” असंही संभाजी पाटील निलंगेकर यांनी नमूद केलं.
“शाहू महाराजांचा वारस असलेल्या छत्रपतींवर कोणीही दबाव टाकू शकत नाही”
संभाजी निलंगेकर म्हणाले, “राजकीय स्वार्थासाठी चंद्रकांत पाटील यांनी छत्रपतींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालवला आहे, असा आरोप संजय लाखे पाटील यांनी केला. असा आरोप करून लाखे पाटील यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान केला आहे. अशा रितीने शाहू महाराजांचा वारस असलेल्या छत्रपतींवर कोणीही दबाव टाकू शकत नाही. त्यांना फक्त आवाहन केले जाऊ शकते. अर्थात हे समजायला आधी भाजपप्रमाणे छत्रपतींचा सन्मान करायला हवा.”
“मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी आंदोलन करावे. भाजप त्यांना पाठिंबा देईल, अशीही भूमिका प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केली. संपूर्ण पक्ष प्रदेशाध्यक्षांशी सहमत आहे,” असं ते म्हणाले.
हेही वाचा :
आरक्षणासाठी लोकांना चिथावणी देऊन भाजपला महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा का? : डॉ. संजय लाखे पाटील
ओबीसींमध्ये नवे प्रवर्ग शक्य आहे का?, ठाकरे, पवार, फडणवीस, चव्हाणांनी सांगावं; खासदार संभाजी छत्रपतींचं आवाहन
बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्षही स्थापन करू; खासदार संभाजी छत्रपती यांचं मोठं विधान
व्हिडीओ पाहा :
BJP Sambhaji Patil Nilangekar criticize Congress Sanjay Lakhe Patil over Maratha reservation