मला नीटपणे संपवण्याचा प्रयत्न, मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही, लवकरच अनेक रहस्यांचा उलगडा होईल : खडसे

"मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळे मला नीटपणे संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही (Eknath Khadse Jalgaon).

मला नीटपणे संपवण्याचा प्रयत्न, मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही, लवकरच अनेक रहस्यांचा उलगडा होईल : खडसे
Follow us
| Updated on: Sep 05, 2020 | 8:32 AM

जळगाव : “मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळे मला नीटपणे संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही (Eknath Khadse Jalgaon). मी स्वस्थ बसणारा राजकारणी नाही. माझ्यावरचे सर्व आरोप खोटे आहेत. मी कोणता उपद्व्याप केलेला नाही. अनेकांवर घोटाळ्यांचे आरोप झालेत सर्वांना क्लीन चिट मिळते. मग मला का क्लीनचिट मिळत नाही. लवकरच अनेक रहस्यांचा उलगडा होईल”, असं भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले (Eknath Khadse Jalgaon).

“बाकीच्यांवर कारवाई होत नाही. माझ्यावर का कारवाई करण्यात आली. माझ्यावरचे खोटे आरोप आतापर्यंत सिद्ध करू शकले नाही. बदनाम करण्यासाठी काही विशिष्ट लोकांनी मीडिया ट्रायल केली होती. जाणीवपूर्वक मला पदावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. भ्रष्ट लोकांना पक्षामध्ये घेतले. मात्र ज्यांनी चाळीस वर्ष जिवाचं रान केले त्यांच्या जीवाची कदर नाही का?”, असंही खडसे म्हणाले.

“मला बदनाम करण्याचं शल्यं माझ्या मनात आहे. त्यामुळेच भाजपा सरकार सत्तेत आले नाही. नेत्यांच्या प्रवृत्तीमुळे हे सरकार येऊ शकले नाही. ओबीसींवर अन्याय बहुजनांवर अन्याय मग त्या कालखंडात या धोरणामुळे बहुजनांची तिकीटं कापली. ज्यांना तिकीट दिली त्यांना हरवलं. माझं तिकीट कापलं, माझ्या मुलीला हरवण्यासाठी प्रयत्न केला. याबबतचे सर्व पुरावे मी दिले आहेत तरी देखील कारवाई होत नाही?”, असं खडसेंनी सांगितले.

“मी असा काय गुन्हा केला. जे लोक या विधानसभेत आडवे येत होते त्यांना आडवे करण्याचे काम यात करण्यात आले. मी कधीच पक्षावर टीका केली नाही. आम्ही कष्टाने आणलेलं भाजपचं सरकार गेल्याची खंत असल्याचे खडसे यांनी सांगितले.”

संबंधित बातम्या :

Pandurang Raykar | हलगर्जीपणा करणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, एकनाथ खडसे आक्रमक

जे काही नियम, अटी लावायच्या आहेत लावा, पण भाविकांना दर्शनाचा लाभ घडू द्या – एकनाथ खडसे

एकनाथ खडसे यांनाही वाढीव वीज बिलाचा शॉक, एका महिन्याचं बिल तब्बल…..

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.