AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किंगमेकर शिवाजी कर्डिलेंचा दारुण पराभव, नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं दणदणीत कमबॅक

नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने दमदार कमबॅक केलंय. लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीने पुन्हा उभारी घेत निर्णायक मते घेतली.

किंगमेकर शिवाजी कर्डिलेंचा दारुण पराभव, नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं दणदणीत कमबॅक
| Updated on: Oct 24, 2019 | 4:25 PM
Share

अहमदनगर : किंगमेकरची भूमिका निभावणारे भाजपचे नेते शिवाजी कर्डिले (Shivaji kardile result) यांचा दारुण पराभव झालाय. नगरच्या राजकारणात नेहमीच शिवाजी कर्डिले (Shivaji kardile result) चर्चेत असतात. पण राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिलेंचा 22 हजार मतांनी पराभव केलाय. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने दमदार कमबॅक केलंय. लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीने पुन्हा उभारी घेत निर्णायक मते घेतली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा 62000 मतांनी विजय झाला. शिवसेनेचे साहेबराव नवले यांचा त्यांनी पराभव केला. यामुळे विखे पाटलांच्या रणनितीला अपयश आलं.

शिर्डीत भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील यांचा 87 हजार मतांनी विजय झाला. बाळासाहेब थोरात यांचे चुलत भाऊ सुरेश थोरात याचा हा मोठा पराभव मानला जातोय.

श्रीरामपूर मतदारसंघातून काँग्रेसचे लहूजी कानडे 21 हजार मतांनी विजयी झाले. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव झाला.

अकोले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार किरण लहामटे यांचा 57 हजार मतांनी दणदणीत विजय झाला. राष्ट्रवादी सोडून भाजपात आलेले मधुकर पिचड यांचा मुलगा विद्यमान आमदार वैभव पिचड यांचा धक्कादायक पराभव झाला. पिचडांचा चाळीस वर्षांचा गड खालसा झाला.

नेवासा विधानसभेत अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख यांचा 31 हजार मतांनी विजय झाला. भाजपाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा त्यांनी पराभव केला. शेतकरी क्रांतीकारी पक्षाच्या माध्यमातून गडाखांनी अपक्ष निवडणूक लढवली. गडाखांना राष्ट्रवादीच्या घुलेंनीही पाठिंबा दिला होता.

कोपरगाव विधानसभेत राष्ट्रवादीचे आशुतोष काळे विजयी झाले. अवघ्या 847 मतांनी त्यांचा विजय झाला. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात राष्ट्रवादीचे आशुतोष काळेंनी विजय मिळवला. भाजपाच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांचा अनपेक्षित पराभव झाला. भाजप बंडखोर विजय वहाडणे आणि विखेंचे मेहुणे राजेश परजणे यांच्या अपक्ष उमेदवारीने स्नेहलता कोल्हे यांना फटका बसल्याचं बोललं जातंय.

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून भाजपच्या मोनिका राजळे यांनीही विजय मिळवला. राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांनी त्यांना चांगली लढत दिली. प्रताप ढाकणे यांनी अनेकदा आघाडी घेतली. पण अखेर मोनिका राजळे यांनी 14 हजार मतांनी विजय मिळवला.

नगर जिल्ह्यातील इतर जागांवरही राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली. रोहित पवारांनी मंत्री राम शिंदेंचा पराभव करत कर्जत-जामखेडमधून विजय मिळवलाय. पारनेरमध्ये निलेश लंके यांनी शिवसेनेच्या विजय औटी यांचा 61 हजार मतांनी पराभव केलाय.

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.