AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : घरात रहा म्हणून सांगत होतात मग का तुम्ही नाही पाळलं? भाजप प्रवक्त्यांचा मोदी-शाहांना सवाल

कोरोनाचा स्फोट झालेला असताना मोदी-शाह बंगालमध्ये मोठमोठ्या गर्दीच्या सभा घेतायत, त्यावर आज भाजपच्या प्रवक्त्यानेच जोरदार टीका केली (BJP Spokesperson Ritu Singh Rawat)

Video : घरात रहा म्हणून सांगत होतात मग का तुम्ही नाही पाळलं? भाजप प्रवक्त्यांचा मोदी-शाहांना सवाल
ritu singh rawat
| Updated on: Apr 22, 2021 | 12:11 PM
Share

मुंबई : कोरोनाची झालेली स्फोट स्थिती आता वेगवेगळ्या पक्षातही मतभेद निर्माण करताना दिसते आहे (BJP Spokesperson Ritu Singh Rawat). कोरोनाचा स्फोट झालेला असताना मोदी-शाह बंगालमध्ये मोठमोठ्या गर्दीच्या सभा घेतायत, त्यावर आज भाजपच्या प्रवक्त्यानेच जोरदार टीका केली (BJP Spokesperson Ritu Singh Rawat Questions PM Narendra Modi And Amit Shah About Corona Situation).

काय म्हणाल्या भाजप प्रवक्त्या रितू रावत?

भारत समाचार नावाचं हिंदी न्यूज चॅनल आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड तसच इतर हिंदी राज्यात ते जास्त बघितलं जातं. याच चॅनलवर कोरोना आणि ऑक्सिजनच्या स्थितीवर चर्चासत्र आयोजीत करण्यात आलं होतं. त्यात भाजपच्या प्रवक्त्या रितू रावत सहभागी झाल्या होत्या. त्याच चर्चासत्रात एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी भाजप सरकारवरच टीकेची झोड उठवली. त्या म्हणाल्या की, ऑक्सिजनचा दुष्काळ आहे, औषधांच्या किंमती वाढवल्यात. एवढच नाही तर लोक मरतायत, तुम्हीच सांगत होतात की, अंतर ठेवा मग तुम्हीच ते का नाही पाळलं, का निवडणुका घेतल्या? जर ह्या पृथ्वीवर माणसच नाही राहीली, सगळं स्मशान झालं तर निवडणुकीचा काय फायदा? सरकारही बनणार, निवडणुकाही होणार तर त्याची एक वेळ असली पाहिजे ना? माझ्या ह्या भूमिकेवरुन जर भाजपनं मला काढून टाकलं तर टाकू द्या, मला ह्याचा त्रास होतोय, मी लोकांची वेदना वाटू शकते.

आणि रितू रावत यांना टीव्हीवर टाळ्या मिळाल्या

रितू रावत यांनी स्वत:च्या भावना व्यक्त केल्यानंतर इतर प्रवक्त्यांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. खुद्द चर्चा घडवणाऱ्या अँकर्सनेही तुम्हाला नमन करत असल्याचं सांगितलं. रितू रावत यांचा हा व्हिडीओ माजी IAS अधिकारी सूर्य प्रताप सिंग यांनी ट्विट केला आहे. अजून तरी रितू रावत यांच्यावर कुठली कारवाई झाल्याची माहिती नाही. रावत यांच्या भूमिकेवर भाजपात मात्र शांतता आहे. तीन दिवसांपुर्वी ही डिबेट झालेली होती. रितू रावत ह्या आक्रमक भाजप नेत्या म्हणून ओळखल्या जातात.

BJP Spokesperson Ritu Singh Rawat Questions PM Narendra Modi And Amit Shah About Corona Situation

संबंधित बातम्या :

‘पंतप्रधान मोदींच्या मनात आकस नाही, पण भाजपमधील ‘शुक्राचार्यांच्या’ राजकारणामुळे महाराष्ट्राच्या मदतीत अडथळे’

संकट मोठे आहे, तुमचे तुम्ही बघा, काळजी घ्या, हेच मोदींच्या भाषणाचे सार, शिवसेनेची सणसणीत टीका

अजित पवारांनी झोप कमी करावी, झेपत नसेल तर पुण्याचं पालकमंत्रीपद सोडा: चंद्रकांत पाटील

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.