..आणि चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना चॉकलेट दिलं!

चंद्रकांत पाटील यांनी आज रात्री पुण्यातील चांदणी चौकात रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. चांदणी चौकातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे रस्त्यावरचे खड्डे लवकर बुजवण्याचे आदेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर आज पाटील यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली आणि काम पाहून तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याला चॉकलेट दिलं!

..आणि चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना चॉकलेट दिलं!
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 11:39 PM

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपला स्पष्टवक्तेपणा आणि विरोधकांना सडेतोड उत्तरं देण्यासाठी ओळखले जातात. मात्र, आज चंद्रकांत पाटील यांचं एक वेगळं रुप पाहायला मिळालं. पाटील यांनी आज अधिकाऱ्यांना थेट चॉकलेट दिलं! त्याचं झालं असं की चंद्रकांत पाटील यांनी आज रात्री पुण्यातील चांदणी चौकात रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. चांदणी चौकातील रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे रस्त्यावरचे खड्डे लवकर बुजवण्याचे आदेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर आज पाटील यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली आणि काम पाहून तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याला चॉकलेट दिलं! (Chandrakant Patil inspects road works at Chandni Chowk in Pune)

पावसाळ्यात चांदणी चौकातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत होती. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी रस्ते दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्यानंतर आज 8 दिवसांनी चंद्रकांत पाटील यांनी रात्री 10 नंतर रस्त्याच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी रस्त्यावरचे खड्डे काही प्रमाणात बुजवल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र, अजूनही बरंच काम पूर्ण व्हायचं बाकी आहे. 24 ऑगस्टला पाटील पुन्हा एकदा रस्त्याच्या कामाची पाहणी करणार आहेत. आज काही प्रमाणात काम पूर्णत्वाकडे जात असल्याचं पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना चॉकलेट दिलं.

मराठा आरक्षणावर चॅनेल्ससमोर चर्चा होऊनच जाऊ द्या

मराठा आरक्षणाबाबत वस्तुस्थिती काय आहे आणि काय करावे याबद्दल राज्यातील प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधींची जाहीर चर्चा चॅनेल्सच्या कॅमेऱ्यांसमोर करावी. भाजपातर्फे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बाजू मांडतील आणि लोकांसमोर एकदा खरे काय आणि खोटे काय हे स्पष्ट होईल, असं थेट आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना दोन दिवसांपूर्वी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर पाटील यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना हे आव्हान दिलं आहे.

मराठा आरक्षणाबाबत अपयश लपविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारने राज्यांना अधिकार देण्यासाठी केलेल्या घटनादुरुस्तीबाबत चुकीची माहिती दिली आहे. या घटनादुरुस्तीबाबत अपप्रचार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जेथे जेथे सभा घेईल तेथे तेथे लगेचच भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचा खोटेपणा उघड करण्यासाठी आणि जनतेला सत्य सांगण्यासाठी पोलखोल सभा आयोजित केल्या जातील, असा इशाराही पाटील यांनी सोमवारी कोल्हापुरात दिलाय.

इतर बातम्या :

नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघ वगळला! कशी असेल राणेंच्या यात्रेची वाटचाल?

‘बिंदू नामावलीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना जागा द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु’, पडळकरांचा इशारा

Chandrakant Patil inspects road works at Chandni Chowk in Pune

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.