‘गुजरात मॉडेलची प्रशंसा करणारे पहिले राज ठाकरे बिगरभाजप नेते, कितीही दूर गेले तरी मैत्री कायम”, मुनगंटीवारांकडून स्तुतीसुमनं

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लवकरच भेटीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी आपलं मत मांडलं.

'गुजरात मॉडेलची प्रशंसा करणारे पहिले राज ठाकरे बिगरभाजप नेते, कितीही दूर गेले तरी मैत्री कायम, मुनगंटीवारांकडून स्तुतीसुमनं
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 12:00 PM

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या लवकरच भेटीची शक्यता आहे. या भेटीच्या चर्चेसोबतच मनसे आणि भाजप युतीची देखील चर्चा होतेय. या पार्श्वभूमीवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी आपलं मत मांडलं. “गुजरात मॉडेलची प्रशंसा करणारे राज ठाकरे हे पहिले भाजपबाहेरचे म्हणजेच बिगरभाजप नेते आहेत. लोकसभा निवडणुकीत ते आमच्यापासून दूर गेले पण त्यांच्याशी मैत्रीचे संबंध कायम आहेत. आता फक्त भेटीगाठी वाढल्याने तुम्हाला अधिक उठावदारपणे दिसत आहेत. एवढंच काय ते”, असं मुनगंटीवार म्हणालेत.

युती होणार का?

वाढती सलगी पाहता भाजप-मनसेची युती होण्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. त्यावर विचारलं असता मुनगंटीवार यांनी त्यावर भाष्य केलं. “राज ठाकरे यांची भेट घेतली म्हणजे युती झाली हा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही, दोन्ही पक्षातील वरिष्ठ याबाबत नेते निर्णय घेतील. श्रेष्ठी योग्य वेळी निर्णय घेतील”, असं मुनगंटीवार म्हणालेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज ठाकरे यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे. अमित शाह लवकरच मुंबई दौरा करणार आहेत. या दौऱ्यावेळी ते राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे. काही दिवसांआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या भेटीची शक्यता आहे.

भाजप-मनसे युती होणार?

शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मधल्या काळात त्यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलून भगवा केला. भाजपने शिंदेगटासोबत सरकार स्थापन केल्यानंतर मनसे-भाजपची सलगी वाढताना दिसतेय. अश्यात आता मनसे आणि भाजपची युती होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.