लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर उदयनराजेंचं भावनिक ट्विट

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील विजयी झाले असून उदयनराजे पराभूत झाले आहे. या पराभवानंतर नुकतंच उदयनराजेंनी एक भावनिक ट्विट केलं (Udayanraje Bhosale Tweet) आहे.

लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर उदयनराजेंचं भावनिक ट्विट
Follow us
| Updated on: Oct 25, 2019 | 10:26 AM

सातारा : राज्यात विधानसभा निवडणुकींच्या निकालासोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचाही निकाल जाहीर झाला. यात साताऱ्याच्या जनतेने छत्रपती उदयनराजे यांच्या विरोधात कल (Udayanraje Bhosale Tweet)  दिला. लोकसभा निवडणुकीत लाखोंच्या मताधिक्याने निवडणुकीत विजयी झालेल्या उदयनराजेंना पोटनिवडणुकीत मोठा पराभव पत्करावा (satara loksabha by election result) लागला. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील विजयी झाले असून उदयनराजे पराभूत झाले आहे. या पराभवानंतर नुकतंच उदयनराजेंनी एक भावनिक ट्विट केलं (Udayanraje Bhosale Tweet) आहे.

“आज हरलो आहे पण थांबलो नाही, जिंकलो नाही पण संपलो ही नाही, असे उदयनराजेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. लोकसभा पोटनिवडणुकीत मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखो जनतेचे आणि दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार. सदैव आपल्या सेवेशी तत्पर असे उदयनराजेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.”

उदयनराजे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी 87 हजार 717 मतांनी पराभव केला. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या या धक्कादायक निकालाने उदयनराजेंच्या समर्थकांमध्ये चांगलीच अस्वस्थता  पसरली. उदयनराजे मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून पिछाडीवर राहिले. उदयनराजे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात (Udayanraje Bhosale Tweet) आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील यांना 6 लाख 36 हजार 620 मते (51.04%) मिळाली. तर उदयनराजेंना 5 लाख 48 हजार 903 मते (44.01%) मिळाली. श्रीनिवास पाटील यांना या पोटनिवडणुकीत 87 हजार 717 मतांची आघाडी मिळाली.

लोकसभा पोटनिवडणुकीतील निकालानंतर उदयनराजेंनी आपण हरल्यास पुढील 5 वर्षे साताऱ्याचा विकास थांबेल असं म्हटलं. “एक पाऊल मागे जाणं हे मोठी झेप घेण्यासाठी असतं. लोकांनी विचार करुन मतदान केलंय. प्रचारात मी काय केलं हे स्पष्टपणे सांगितले आहे. मी जर निवडून आलो नाही, तर पुढील 5 वर्षे विकास थांबेल.” असे उदयनराजे भोसले म्हणाले.

साताऱ्यातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर मिळवलेल्या खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसले यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसोबतच साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीचीही (Satara Loksabha Bypoll Result) घोषणा केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना साताऱ्यातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे साताऱ्याच्या जागेसाठी उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशी लढत झाली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.