AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रश्नच नाही; गोखलेंच्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

भाजपाला शिवसेनेसोबत युती करण्यात काडीचाही रस नसल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. आम्हाला शिवसेनेचा व्यवहार पटत नसल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रश्नच नाही; गोखलेंच्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
चंद्रकांत पाटील, उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 15, 2021 | 7:15 AM

मुंबई – भाजपाला शिवसेनेसोबत युती करण्यात काडीचाही रस नसल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. आम्हाला शिवसेनेचा व्यवहार पटत नाही. राज्यात जे काय चालू आहे ते चुकीचे चालू आहे. त्यामुळे यापुढे शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही. बाळासाहेबाची शिवसेना आणि या सध्याच्या शिवसेनेमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत युती करणार नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. विषेश म्हणजे शिवसेना आणि भाजपाने  एकत्रं यायला हवे, या युतीला पर्याय नसल्याचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी नुकतेच म्हटले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी आम्ही शिवसेनेसोबत युती करण्यास इच्छूक नसल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले गोखले ?

ज्या कारणाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. सध्याचं जे गणित आहे ते चुकलेलं आहे. हे सुधारायचं असेल तर शिवसेना आणि भाजप एकत्रं आल्याशिवाय पर्याय नाहीच, असं रोखठोक मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं.अभिनेते विक्रम गोखले यांनी मीडियाशी संवाद साधताना हे मत व्यक्त केलं. शिवसेना-भाजप एकत्र यावेत म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांना – ज्यांना खरच वाटतं की शिवसेना – भाजप युती व्हावी त्यांनी देखील शिवसेना- भाजप युतीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन विक्रम गोखले यांनी केले होते. परंतु गोखलेंच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारला असता, आम्हाला युतीची इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बाळासाहेबांवर माझी श्रद्धा 

बाळासाहेबांवर माझे प्रेम आहे. हे प्रेम राजकीय किंवा बेगडी नाही. भाजप -शिवसेना एकत्र यावेत या इच्छेतून मी बाळासाहेंबावर प्रेम करतो असे नाही. असेही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना आणि आताची शिवसेना यामध्ये जमीनअस्मानचा फरक आहे. मी मुंबईमध्ये राहातो, माझ्या घराच्या चारही बाजुने मुस्लिम वस्ती होती. जेव्हा दंगे व्हायचे तेव्हा भीतीचे वातावरण असायचे मात्र त्याकाळची शिवसेना आम्हाला पंधरा-पंधऱा दिवस माझ्या घरापासून जवळच असलेल्या नारळवाडी परिसरात सुरक्षीतपणे स्थलांतरीत करायची. बाळासाहेब असताना आम्हाल कशाचीही भीती नव्हती. म्हणूनच माझे बाळासाहेबावरील प्रेम हे राजकीय नसून, त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेपोटी  आहे.

संबंधित बातम्या 

पंढरपूरमध्ये पराभव, आता बुलडाण्याचं दुकानही बंद व्हायला वेळ लागणार नाही, नाना पटोलेंचा राष्ट्रवादीला टोला

महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे ‘जनजागरण अभियान’: नाना पटोले

BJP Meeting | फडणवीस, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपची मंगळवारी बैठक, महत्त्वाच्या 3 ठरावांवर चर्चा

'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.