मुंबई: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. अशोक चव्हाण समाजाला न्याय देऊ शकत नाही, अशी भावना मराठा समाजात निर्माण झाली असेल तर ते त्यांचा राजीनामा मागतील. मी व्यक्तिश: किंवा भाजप अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. (bjp won’t ask for resignation to ashok chavan, says chandrakant patil)
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची अशोक चव्हाणांबाबतची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर त्यांनी ट्विट करूनही आपली भूमिका मांडली आहे. अशोक चव्हाण मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाहीत, अशी भावना जर मराठा समाजात रुजली असेल तर मराठा समाज त्यांचा राजीनामा मागेल. पण मी व्यक्तिशः व आमचा पक्ष कोणाचाही राजीनामा मागणार नाही. हे सगळे कामकाज त्यांनी नीट सतर्कतेने पाहावे हेच आमचे म्हणणे आहे, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षणासंदर्भातील निकालपत्र अभ्यासण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने एक समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल दिला आहे. पण या समितीने दाखल केलेल्या अहवालात आम्ही वारंवार मांडत असलेले निष्कर्षच अधोरेखित केले आहेत, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.
आम्ही ‘सारथी’ला एक एकर जागा दिली. आता तिथे आम्ही भवन उभारत आहोत, असे अजितदादा सांगत आहेत. पण ती बिल्डिंग बांधायला 5 वर्ष लागतील. अजितदादा, या 5 वर्षांमध्ये भाडे तत्त्वावर एखाद्या जागेत का होईना पण ‘सारथी’चे कामकाज चालवणार आहात की नाही?, असा सवालही त्यांनी केला.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरूनही त्यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना सवाल केले आहेत. ओबीसी समाजाचे सर्वेक्षण होऊन अहवाल यायला किती वेळ लागेल हे मंत्री विजय वडेट्टीवार यांना माहिती आहे का? ओबीसी आरक्षणसंदर्भातील महाविकास आघाडी सरकारच्या कॅज्युअल अॅप्रोचचा आम्ही निषेध करतो, असं त्यांनी म्हटलं आहे. (bjp won’t ask for resignation to ashok chavan, says chandrakant patil)
@AshokChavanINC मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना जर मराठा समाजात रुजली असेल तर मराठा समाज त्यांचा राजीनामा मागेल, पण मी व्यक्तिशः व आमचा पक्ष कोणाचाही राजीनामा मागणार नाही. हे सगळे कामकाज त्यांनी नीट सतर्कतेने पाहावे हेच आमचे म्हणणे आहे. pic.twitter.com/zjPEBkAGDD
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 5, 2021
संबंधित बातम्या:
‘अजित पवारांना झोपेत सरकार कशी करतात ते माहिती, पण टिकवता येत नाही’, चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर
लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम; पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी वेगळा विचार- अजित पवार
‘मी सारखा झोपेतून उठतो की सरकार पडलं का काय…!’ अजितदादांचा पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांना टोला
(bjp won’t ask for resignation to ashok chavan, says chandrakant patil)