BJP letter to governor : भाजपचं राज्यपालांना पत्र! पत्राद्वारे भाजपची मोठी मागणी, नेमकं पत्रात काय? वाचा सविस्तर

प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना लिहिलेलं पत्र जसच्या तसं...

BJP letter to governor : भाजपचं राज्यपालांना पत्र! पत्राद्वारे भाजपची मोठी मागणी, नेमकं पत्रात काय? वाचा सविस्तर
मोठी बातमीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 12:49 PM

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) राज्यपालंना पत्र लिहिलंय. आताच्या राजकीय भूकंपातली ही सगळ्यात मोठी बातमी मानली जातेय. राज्यातील घडामोडींवर भाष्य करणाऱ्या या पत्रातून मोठी मागणी राज्यपालांकडे (Maharashtra Governor) भाजपने केली आहे. एकनाथ शिंदे (Eknah Shinde News) यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. याबाबत गेले काही दिवस भाजप सावध पवित्रा घेताना दिसत होती. वेट एन्ड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने अखेर आता राजकीय पावलं उचलायलाही सुरुवात केलीय. पहिल्यांदाच राजकीय भूकंपानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते असलेल्या प्रवीण दरेकरांनी राज्यपालांना महाविकास आघाडीच्या गेल्या 48 तासांच्या कामगिरीवरुन शंका उपस्थित केली आहे.

प्रवीण दरेकरांचं पत्र जसंच्या तसं

दिनांक : 24, जून 2022

प्रति,

हे सुद्धा वाचा

मुंबई, दि. 24 जून 2022

मा. भगतसिंग कोश्यारीजी

महामहीम राज्यपाल, महाराष्ट्र

विषय: राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, त्याचे जारी होत असलेले जीआर आणि त्यात तातडीने आपला हस्तक्षेप होण्याबाबत

महोदय,

कोरोनाच्या संसर्गातून आता आपली प्रकृती सुधारत असेलच, आपल्याला उत्तम आरोग्य लाभो, अशी मी प्रार्थना करतो

एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. राज्यातील राजकीय स्थिती ही अत्यंत अस्थिरतेची गेल्या तीन दिवसांत बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि तदनंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनिषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळले आहे

अशात राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णयसपाटा राबविला जात आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे. आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त सुद्धा प्रकाशित झाले आहे. 160 च्या वर शासन आदेश 48 तासांत जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे. अडीच वर्ष निर्णयशून्य असलेले महाविकास सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे, अशी स्थिती आहे. पोलिस दल व अन्य महत्त्वाच्या विभागातील बदल्यांचा सुद्धा घाट घातला जात आहे. आपल्याला विदित आहेच की, यापूर्वी पोलिस दलात झालेल्या महाभ्रष्टाचारात थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनाच जेलमध्ये जावे लागले आहे.

महाराष्ट्राच्या व्यापक हिताच्या दृष्टीने आणि जनतेच्या हवकाच्या असलेल्या या निधीच्या गैरवापरात आपण तातडीने हस्तक्षेप करावा आणि या प्रकाराला पायबंद घालावा, ही आपल्याला नम्र विनंती आहे.

प्रवीण दरेकर

विरोधी पक्षनेता, विधानपरिषद

सध्याची राजकीय स्थिती पाहता राज्यपालाना हस्तक्षेप करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपने पाठवलेल्या पत्रावर राज्यपाल नेमकी काय ाकरावई करतं, हे पाहणं महत्त्वाचंय.

पाहा व्हिडीओ :

राष्ट्रवादी, काँग्रेसमधून बाहेर पडण्याची बंडखोरांची मागणी

महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी, बंडखोर शिवसेना आमदारांनी केली आहे. निधी न मिळणं, पक्षाच नुकसान होणं, घट पक्षांकडून खच्चीकरण केलं जाणं, असे आरोप बंडखोर शिवसेना आमदारांनी केले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्त्वाचा विचारही पुढे घेऊन जाण्यासाठी अनैसर्गिक आघाडीचा त्याग करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्याकडे 37 शिवसेना आमदारांसह अपक्ष आमदारांचाही पाठिंबा. 50 पेक्षा जास्त आमदार आपल्याकडे समर्थनात असल्याचा दावा खुद्द एकनाथ शिंदे यांनी केलाय. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यासाठी शिवसेनेला साथ देणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केलंय.

वाचा LIVE घडामोडी : Eknath Shinde vs Shiv Sena LIVE

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.