AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्यांनी खडसेंना न्याय दिला नाही, मग तुमची काय गत होईल? आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चला’

युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचा त्याग करुन आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावे, असे खडसे समर्थकांनी म्हटले. | Eknath Khadse supporters

'त्यांनी खडसेंना न्याय दिला नाही, मग तुमची काय गत होईल? आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चला'
| Updated on: Oct 23, 2020 | 11:03 AM
Share

मुंबई: ज्या एकनाथ खडसे यांनी भाजपसाठी आपलं सर्व आयुष्य वेचलं त्यांना पक्षात न्याय मिळाला नाही. तिथे आपली काय गत होईल, याचा विचार भाजप युवा मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी करावा. त्यामुळे तुम्हीदेखील भाजपचा त्याग करुन आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चला, असे आवाहन खडसे समर्थकांनी जळगावातील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना केले. भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर प्रचंड अन्याय झाला. त्यांच्या या निर्णयाची आम्ही गेल्या एक-दीड वर्षापासून वाटच पाहत होतो. नाथाभाऊ आता राष्ट्रवादीत गेल्यावर आम्ही त्यांच्यासोबतच राहू, अशी भावना खडसे समर्थकांनी व्यक्त केली. (BJP yuva Morcha workers should join NCP says Eknath Khadse supporters)

एकनाथ खडसे गुरुवारीच मुंबईत दाखल झाले होते. आज दुपारी दोन वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. यासाठी खडसे यांचे मुक्ताईनगरमधील समर्थकही मुंबईत आले आहेत. या समर्थकांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी खडसे समर्थकांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. गिरीश महाजन केवळ नाथाभाऊंसोबत आहोत, असे दाखवत होते. पण प्रत्यक्षात ते देवेंद्र फडणवीस यांचे मित्र होते. यामुळेच ते नाथाभाऊंना सुप्तपणे विरोध करत होते, अशी खदखद या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

‘उत्तर महाराष्ट्राला माझ्याकडून अपेक्षा’ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्यापूर्वी शुक्रवारी सकाळी एकनाथ खडसे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उत्तर महाराष्ट्राला माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा असल्याचे सांगितले. उत्तर महाराष्ट्रात विकासकामांची गरज आहे. त्यासाठी आम्हाला सरकारची साथ हवी असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची राजकीय वर्तुळाला उत्सुकता गेल्या चार दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रवेशासाठी काल दुपारी विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने सहकुटुंब मुंबईत दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश होईल.

संबंधित बातम्या:

Special Report | एकनाथ खडसे राष्ट्रवादीत, उत्तर महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम?

फडणवीसांच्या छळाला कंटाळून भाजपला राम-राम, एकनाथ खडसे यांचा हल्लाबोल

Eknath Khadse | काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, फडणवीसांनी छळले : एकनाथ खडसे

(BJP yuva Morcha workers should join NCP says Eknath Khadse supporters)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.