Jayant Patil : भाजपाचे बेगडी हिंदूत्व, जयंत पाटलांनी सांगितले शिवसेना फोडण्यामागचे सर्वात मोठे कारण..!
गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणूकांच्या तोंडावर भाजप-मनसेमध्ये युती होईल अशी चर्चा रंगलेली आहे. शिवाय त्या दृष्टीकोनातून हालचालीही सुरु आहेत. मात्र, हे दोन पक्ष एकत्र आले तर हिंदी भाषिकांच्या मतांचा प्रश्न उपस्थित होईल अशी एक भीती भाजपामध्ये आहे. तर दुसरीकडे मराठी मतदार हे उद्धव ठाकरेंबरोबर असल्याने त्यांचा वेगळा प्रश्न निर्माण होईल.
नागपूर : (Shiv Sena) शिवसेनेत बंड होऊन आता दोन महिन्यांपेक्षा अधिकचा काळ उलटला आहे. यामागचे कारण वेगवेगळ्या पद्धतीने समोर आलेही आहे. मात्र, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (Jayant Patil) जयंत पाटील यांनी यामागे नेमके काय कारण याबाबत मोठे विधान केले आहे. शिवसेना आणि भाजपात हिंदूत्ववादी मतांची दुफळी निर्माण होते म्हणूनच भाजपाने हा डाव साधला आहे. त्यामुळे त्यांना हिंदूत्वाशी घेणे-देणे नाहीतर मतांच्या गोळाबेरजेसाठी केलेला कयास असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. शिवाय (BJP Party) भाजपाचे हिंदूत्व हे बेगडी आहे. एक दिवस ते सर्वांसमोर येईलच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आगामी निवडणूकांच्या अनुशंगाने जयंत पाटील हे विदर्भात पक्ष संघटनेच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी भाजपावर सडकून टीका तर केलीच पण मनसे आणि भाजप एकत्र आल्यावर काय? याची भविष्यावाणीही केली आहे.
भाजप- मनसे एकत्र आले तर..!
गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणूकांच्या तोंडावर भाजप-मनसेमध्ये युती होईल अशी चर्चा रंगलेली आहे. शिवाय त्या दृष्टीकोनातून हालचालीही सुरु आहेत. मात्र, हे दोन पक्ष एकत्र आले तर हिंदी भाषिकांच्या मतांचा प्रश्न उपस्थित होईल अशी एक भीती भाजपामध्ये आहे. तर दुसरीकडे मराठी मतदार हे उद्धव ठाकरेंबरोबर असल्याने त्यांचा वेगळा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे मनसे आणि भाजपा ही युती होण्यापूर्वी अनेक बाबींवर अभ्यास केला जाईल. पण हे एकत्र येतील की नाही याबाबतही अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या निर्णयाबाबत आपण बोलणे उचित नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
मतांचे विभाजन म्हणून भाजपाचा हा डाव
हिंदूत्व हा केवळ एक मुद्दा आहे, त्यामागून राजकारण हेच भाजपाचा खरा उद्देश असल्याचे जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. हिंदूत्ववादी मतांची दुफळी पडते म्हणून शिवसेना फोडण्याचे काम भाजपाकडून झाले आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी हा पक्ष कोणत्या स्थराला जाईल हे सबंध देशातील जनतेने पाहिलेले आहे. त्यामुळे हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन नाहीतर मतांच्या राजकारणासाठी शिवसेना फोडल्याचा घणाघात पाटील यांनी केला आहे.
सदस्य वाढीवर भर
आगामी काळात महापालिकेबरोबर इतर निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष हे संघटनात्मक वाढीवर भर देत आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि सदस्य नोंदणीसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नागपूर दौऱ्यावर आहेत. या निवडणूका ह्या पक्ष संघटनेत होणार आहेत. त्यामुळे सदस्य नोंदणीवर भर दिला जात आहे. त्याच अनुशंगाने जयंत पाटील हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपुरात राष्ट्रवादीची कार्यकरणी बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.