AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : भाजपच्या मंत्रिपदाची यादी फायनल..! शिंदे-भाजपातील वाटाघाटीमुळे रखडला विस्तार

मुंबई : सत्तांतराच्या नाट्यानंतर राज्यात चर्चा सुरु आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची. महिन्याभरापासून (Expansion of the Cabinet) मंत्रिमंडळाचा विस्तार हा रखडलेला आहे. यावरुन विरोधकांकडून वेगवेगळे आरोप होत आहेत तर आता पावसाळी अधिवेशनचाही मुद्दा गाजत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असताना (Devendra Fadnvis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवारीवर गेले होते त्याचवेळी भाजपाच्या मंत्रिपदाची यादी फायनल […]

Eknath Shinde : भाजपच्या मंत्रिपदाची यादी फायनल..! शिंदे-भाजपातील वाटाघाटीमुळे रखडला विस्तार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
| Updated on: Aug 05, 2022 | 11:06 PM
Share

मुंबई : सत्तांतराच्या नाट्यानंतर राज्यात चर्चा सुरु आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची. महिन्याभरापासून (Expansion of the Cabinet) मंत्रिमंडळाचा विस्तार हा रखडलेला आहे. यावरुन विरोधकांकडून वेगवेगळे आरोप होत आहेत तर आता पावसाळी अधिवेशनचाही मुद्दा गाजत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असताना (Devendra Fadnvis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीवारीवर गेले होते त्याचवेळी भाजपाच्या मंत्रिपदाची यादी फायनल झाल्याचे सांगितले जात आहे. शिवाय पक्षश्रेष्ठींदेखील नव्या चेहऱ्यांना संधी देण्यास इच्छूक असल्याने ज्याप्रमाणे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची अचानक निवड करण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला तशीच काही धोरणे मंत्रिपदाबाबतही भाजप राबवणार का हे पहावे लागणार आहे. शिंदे गट आणि भाजपातील वाटाघाटीमुळे विस्तार रखडला आहे. तर शनिवार आणि रविवार असे दोन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीवारी आहेत. त्यामुळे दोन दिवसांमध्ये शिक्कामोर्तब आणि सोमवारी प्रत्यक्षात विस्तार होणार का हे पहावे लागणार आहे.

विस्तार टप्प्याटप्प्याने का एकाच वेळी..!

संत्तातंरानंतर लागलीच देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकालाच पद मिळेल असे नाही, तर काहींना थांबावेही लागणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे भाजप नेत्यांना आगोदरच सूचक इशारा मिळाला आहे. असे असतानाच पक्षश्रेष्ठी हे नवख्या चेहऱ्याला पसंती देणार असल्याचे बोलले जात आहे. हे सर्व होत असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यामध्ये सर्वकाही फायनल होणार असल्याचे संकेत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असला तरी टप्प्याटप्प्याने का एकाच वेळी सर्व मंत्री हे शपथ घेणार पहावे लागणार आहे. इतर राज्यातील उदाहरणे पाहता भाजपाकडून टप्प्याटप्प्यानेच विस्तार करण्यात आला आहे.

विरोधकांकडून वेळोवेळी टीका

जेवढा वेळ सत्ता स्थापनेला लागला नाही तेवढा वेळ आता मंत्रिमंडळ विस्ताराला लागत आहे. राज्यात पावसाने विदारक स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना मदतीची प्रतिक्षा आहे. शिवाय त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यास ना प्रशासकिय अधिकारी पोहचला आहे ना लोकप्रतिनिधी. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर वेळच्यावेळी कामे मार्गी लागतात असे अजित पवार यांनी सांगितले होते. मात्र, त्यांचे घोडं नमके अडलंय कुठे हे देखील समजत नाही. सर्वकाही केंद्राच्या हाती असल्याचे टीका विरोधकांकडून होत आहे.

शिंदेंच्या गोठात काय सुरुय?

शिंदे गटात जे आगोदर मंत्री होते त्यांना तर संधी मिळणार असेच चित्र आहे तर ज्यांनी बंडखोरी यशस्वी केली किंवा त्या दरम्यान, महत्वाची भूमिका घेतली त्यांना देखील मोठ्या पदाची अपेक्षा निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपापेक्षा शिंदे गटातील इच्छूकांची समजूत काढायची कशी असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे. तर काहींनी यापूर्वीच मंत्रिपदासाठी इच्छूक असल्याचे बोलून दाखवले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार सर्वच बाजूंनी महत्वाचा ठऱणार आहे.

निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.