Mahadev Jankar : बारामतीवर भाजपचं लक्ष्य, 16 ते 18 ऑगस्टला अर्थमंत्री सीतारमण बारामतीत येणार, जानकरांनी सांगितली पवारांची स्ट्रॅटेजी

बारामती हा पवरांसाठी अभेद्य किल्ला राहिलाय. पण, बारामतीला भाजपनं जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे, यावर महादेव जानकर यांनी स्टॅटेजी ठरविली.

Mahadev Jankar : बारामतीवर भाजपचं लक्ष्य, 16 ते 18 ऑगस्टला अर्थमंत्री सीतारमण बारामतीत येणार, जानकरांनी सांगितली पवारांची स्ट्रॅटेजी
16 ते 18 ऑगस्टला अर्थमंत्री सीतारमन बारामतीत येणार
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 10:14 PM

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांचं प्राबल्य आहे. पण, भाजपनं लक्ष केंद्रीत केल्यास त्याठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो. यासंदर्भात महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीला हरविण्याची स्ट्रॅटजी सांगितली. ते म्हणाले, बारामतीत बदल होऊ शकतो. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) पण निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. पवारांच्या राजकीय दबावाला (Political pressure) कुणी बळी पडू नये. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या शरद पवारांच्या कन्या आहेत. मात्र जनतेनं ठरवलं तर त्यांना हरवणं काय अवघड नाही. मी 8 दिवसांत तयारी केली होती. तेव्हा सुप्रिया सुळे 34 हजारांनी निवडून आल्या. मला जर 1 महिना मिळाला असता तर मला विजय मिळाला असता, असं मत महादेव जानकर यांनी व्यक्त केलं.

जानकरांनी लढविली होती सुळेंच्या विरोधात उमेदवारी

भाजपनं बारामती लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केलंय. बारामती हा पवरांसाठी अभेद्य किल्ला राहिलाय. पण, बारामतीला भाजपनं जिंकण्यासाठी काय केलं पाहिजे, यावर महादेव जानकर यांनी स्टॅटेजी ठरविली. निर्मला सीतारामन जर बारामतीत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे. रासपचे महादेव जानकर यांनी भाजपच्या मिशन 45 वर प्रतिक्रिया दिली. महादेव जानकरांनी 2014 ला सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

हे सुद्धा वाचा

जागा रासपला सोडली तर विचार करू

महादेव जानकर म्हणाले, आम्ही एनडीएत आहोत जर भाजपानं जागा रासपला सोडली तर निवडणूक लढवण्याचा विचार करू. मात्र भाजपच्या चिन्हावर लढणार नाही. रासपच्याच चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बारामतीत एका बाजूला धरण आहेत. तर दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी घशाला कोरड पडली आहे. इंदापूर तालुक्यातील 12 गावांचा पाणीप्रश्न गंभीर आहे. बारामती तालुका विधानसभा मतदारसंघातील 26 गावांत पाण्याचा प्रश्न आहे. याकडं लक्ष वेधलं पाहिजे. खडकवासल्यात आंबेगाव पठारात पाण्याची बोंब आहे. एकीकडं धरण आहेत. पण, दुसरीकडं पाण्यासाठी ओरड आहे. हे मुद्दे घेऊन निवडणूक लढली, तर राष्ट्रवादीचा पराभव होऊ शकतो, असं महादेव जानकर यांना वाटतं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.