भाजपाचे लोकसभेसाठी राज्यात ‘धन्यवाद मोदीजी’ अभियान; तर विधानसभा निवडणुकीसाठी ‘हा’ प्लॅन
भाजपाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. 'मिशन 45 'च्या पार्श्वभूमीवर आता राज्यात भाजपाच्या वतीने 'धन्यवाद मोदीजी' अभियान राबवण्यात येणार आहे.
मुंबई : भाजपाने (BJP) आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची (Election) जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘मिशन 45 ‘च्या पार्श्वभूमीवर आता राज्यात भाजपाच्या वतीने ‘धन्यवाद मोदीजी’ (Narendra Modi) अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या अभियानातंर्गत भाजपाच्या वतीने केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधण्यात येणार आहे. तसेच अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकूण दहा लाख पत्र पाठवण्याचं नियोजन राज्य भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.
निर्मला सीतारमण यांचा दौरा
‘मिशन 45’ च्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन या पुणे दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. सध्या भाजपकडून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर निर्मला सीतारमन यांनी हा दौरा आयोजित केला होता.
विधानसभेची तयारी
एकीकडे भाजपाकडून राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. मात्र त्याचबरोबर भाजपाने विधानसभा निवडणुकीची तयारी देखील सुरू केल्याचं पहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकएक मतदारसंघ पिंजून काढा अशा सूचना भाजप पक्षश्रेष्ठींकडून मंत्र्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात भाजप मंत्र्यांकडून दौरे आयोजीत केले जाणार आहेत.
काय आहे भाजपाचे ‘धन्यवाद मोदीजी’ अभियान?
भाजपाकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात धन्यवाद मोदीजी अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहा लाख पत्र देखील पाठवण्यात येणार आहे.