BJP : केजरीवालांची ‘त्या’ रिक्षा सवारीनंतर भाजपाचे अनोखे गिफ्ट, चर्चेला उधाण
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ताफ्यामध्ये 27 वाहने आहेत. शिवाय ताफ्याशिवाय ते दिल्लीत प्रवास करीत नाहीत. पण गुजरातमध्ये जाऊन त्यांनी केलेला हट्ट म्हणजे केवळ दिखावूपणा होता. त्यामुळे 5 अॅटोरिक्षा घेऊन आपण त्यांच्या निवासस्थानाबाहेर आल्याचे विरोधी पक्षनेते रामवीरसिंग बिधुरी यांनी सांगितले.
दिल्ली : आठवतयं ना दिल्लीचे (CM Arvind Kejriwal) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे (Ahmedabad) अहमदाबादच्या दौऱ्यावर असातना त्यांनी (Auto Rickshaw) रिक्षातून प्रवास करण्याचा हट्ट केला होता. मात्र, गुजरात पोलिसांनी त्यांनी विरोध केल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. फाईव्ह स्टार हॉटेलमधून बाहेर निघत मुख्यमंत्री केजरीवाल हे एका रिक्षाचालकाच्या घरी जेवणासाठी निघाले होते. पण हे सर्व नाटक होते तर त्यांची रिक्षातून प्रवास करण्याची हौस दिल्लीत पूर्ण व्हावी म्हणून येथील विरोधी पक्षनेते रामवीरसिंग बिधुरी हे मुख्यमंत्र्याना पाच अॅटोरिक्षा देण्यासाठी थेट त्यांच्या घराबाहेर दाखल झाले होते.
चार दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल हे अहमदाबादच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, ते एका रिक्षाचालकाच्या घरी जेवणासाठी निघाले होते. त्यासाठी त्यांनी रिक्षामधूनच प्रवास करण्याचे ठरवले पण सुरक्षतेच्या कारणामुळे पोलिसांनी त्यांना विरोध केला होता. पण हे सर्व दिखाव्यासाठी केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ताफ्यामध्ये 27 वाहने आहेत. शिवाय ताफ्याशिवाय ते दिल्लीत प्रवास करीत नाहीत. पण गुजरातमध्ये जाऊन त्यांनी केलेला हट्ट म्हणजे केवळ दिखावूपणा होता. त्यामुळे 5 अॅटोरिक्षा घेऊन आपण त्यांच्या निवासस्थानाबाहेर आल्याचे विरोधी पक्षनेते रामवीरसिंग बिधुरी यांनी सांगितले.
दिल्लीचे विरोधी पक्षनेते रामवीरसिंग बिधुरी यांनी केवळ अॅटोरिक्षा देण्याचेच सांगितले नाहीतर यामध्ये सुरक्षाही होऊ कशी होऊ शकते याचे गणित मांडले. मुख्यमंत्री स्वत: रिक्षा चालवणार, तर मागे दोन अंगरक्षक आणि स्वीय सचिवही रिक्षामध्ये बसून शकते असेही त्यांनी सूचवले आहे.
अहमदाबाद येथील दौरा म्हणजे केवळ एख स्टंट होता. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेले मुख्यमंत्री हॉटेलच्या खाली आले काय आणि थेट रिक्षात बसून निघाले काय..? हा केवळ दिखाऊपणा होता. त्यांची हौस पुरवण्यासाठी 5 अॅटोरिक्षाचे गिफ्ट त्यांना देण्यासाठी आल्याचे बिधुरी यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.