PM Security : पंतप्रधानांच्या हेलिकॅप्टरसमोर काळे फुगे सोडले, विजयवाड्यात निषेध करणारे काँग्रेसचे 3 कार्यकर्ते अटकेत
पंतप्रधान म्हणाले, स्वातंत्र्य संग्राम काही लोकांचा इतिहास नाही. हा इतिहास त्याग आणि बलिदानाचा इतिहास आहे. अल्लुरी सीताराम राजू यांनी आपलं जीवन आदिवासी समाजाच्या अधिकारासाठी समर्पित केले. राजू यांची जीवनयात्रा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत त्रृटी दिसून आली. पंतप्रधानांच्या ताफ्यातील दोन हेलिकॅप्टरनं विजयवाडा येथील गन्नावरम विमानतळावर (Airport) उड्डाण भरली होती. त्याचवेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विमानतळाजवळ एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून काळे फुगे हवेत सोडले. ते पंतप्रधानांच्या दौऱ्याचा विरोध करत होते. पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. फुग्यांसोबत पोस्टरही बांधण्यात आले होते. विमानतळ परिसरात सुरक्षा व्यवस्था तैनात होती. पण, पंतप्रधानांच्या हेलिकॅप्टरनं उड्डाण भरल्यानंतर या आरोपींनी हवेत फुगे सोडल्याची माहिती पोलीस अधीक्षक सिद्धार्थ कुशल (Superintendent of Police Siddharth Kushal) यांनी दिली.
#WATCH | A Congress worker released black balloons moments after PM Modi’s chopper took off, during his visit to Andhra Pradesh.
हे सुद्धा वाचा(Source: unverified) pic.twitter.com/ZYRlAyUcZK
— ANI (@ANI) July 4, 2022
30 फूट उंच प्रतीमेचे लोकार्पण
पंतप्रधान मोदी हे सोमवारी स्वतंत्रता सेनानी अल्लुरी सीताराम राजू यांच्या 125 व्या जयंती समारोहात सहभागी होण्यासाठी आंध्र प्रदेशात गेले होते. यावेळी राजू यांच्या 30 फूट उंच कान्स्य प्रतीमेचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी मोदी म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत. अल्लुरी सीताराम राजू गारु यांची 125 वी जयंती साजरी होत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी रम्पा क्रांतीचे 100 वर्षे पूर्ण होत आहेत.
राजू यांचे जीवन प्रेरणादायी
अल्लुरी सीताराम राजू यांचे जीवन हे प्रेरणादायी असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. पडरंगी येथे त्यांच्या जन्मस्थळाचा जीर्णोद्धार, चिंतापल्ली ठाण्याचा जीर्णोद्धार, मोगल्लू येते ध्यान मंदिराचे निर्माण करण्यात येत आहे. पंतप्रधान म्हणाले, स्वातंत्र्य संग्राम काही लोकांचा इतिहास नाही. हा इतिहास त्याग आणि बलिदानाचा इतिहास आहे. अल्लुरी सीताराम राजू यांनी आपलं जीवन आदिवासी समाजाच्या अधिकारासाठी समर्पित केले. राजू यांची जीवनयात्रा आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
हैदराबादला म्हणाले भाग्यनगर
पंतप्रधान मोदी 2-3 जुलैच्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी झाले होते. कार्यकारिणीच्या बैठकीत दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी हैदराबादला भाग्यनगर असं संबोधले. यावेळी त्यांनी एनडीएची राष्ट्रपदी पदासाठीची उमेदवार द्रोपदी मुर्मू यांच्या उमेदवारीचे कौतुक केले. हा एक ऐतिहासिक निर्णय असल्याचं मोदी म्हणाले.