AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पुढचा महापौर आमचा’ नारा दिल्यानंतर भाजपचं शिवसेनेची डोकेदुखी वाढवणारं पाऊल

मुंबई महापालिकेतही महाविकास आघाडी तयार होणार असल्याने शिवसेनेला पेचात पकडण्यासाठी भाजप आता पालिकेत विरोधीपक्ष नेतेपद घेणार आहे.

'पुढचा महापौर आमचा' नारा दिल्यानंतर भाजपचं शिवसेनेची डोकेदुखी वाढवणारं पाऊल
| Updated on: Dec 10, 2019 | 8:57 AM
Share

मुंबई : ‘पुढचा महापौर आमचा’ असा नारा देत भाजपने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आतापासूनच कंबर कसल्याचं दाखवलं. त्यानंतर भाजपने बीएमसीमध्ये विरोधी पक्षनेतेपदावर (BMC BJP Opposition Party) दावा करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधीपक्ष नेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता भाजप मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार आहे. पालिकेत सध्या काँग्रेसचा विरोधीपक्ष नेता आहे, पण पालिकेतही महाविकास आघाडी तयार होणार असल्याने शिवसेनेला पेचात पकडण्यासाठी भाजप आता पालिकेत विरोधीपक्ष नेतेपद घेणार आहे.

मुंबई महापालिकेत भाजपचं संख्याबळ 83 इतकं आहे. त्यामुळे भाजपकडून विरोधीपक्ष नेतेपद मिळवण्याची तयारी  सुरु झाली आहे. भाजप नगरसेवक प्रभाकर शिंदे, राम बारोड , प्रकाश गंगाधरे यांची नावं विरोधीपक्ष नेतेपदासाठी चर्चेत आहेत. महापालिकेत भाजपने विरोधीपक्ष नेतेपद स्वीकारलं, तर शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे.

“मुंबईचा पुढचा महापौर भाजपचा असणार, त्या दृष्टीने आमची मजबूत तयारी सुरु आहे. गेल्यावेळी आम्ही एक ते दोन जागांवर कमी पडलो होतो. पण आता मुंबईचा महापौर भाजपचा असेल”, असं आमदार राम कदम दोनच दिवसांपूर्वी म्हणाले होते.

मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईत मोर्चेबांधणीला (BMC BJP Opposition Party) सुरुवात झाली आहे. तसेच बैठकाही आयोजित केल्या जात आहेत.

शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर नुकत्याच मुंबईच्या महापौरपदी विराजमान झाल्या. त्याआधी, सेना-भाजपमध्ये अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावरुन बिनसल्यामुळे भाजप महापौरपदासाठी उमेदवार देईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र भाजपने मुंबई महापौरपदाची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली आणि पेडणेकर बिनविरोध निवडून आल्या.

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

  • शिवसेना – 94
  • भाजप – 83
  • काँग्रेस – 29
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 8
  • समाजवादी पक्ष– 6
  • एमआयएम – 2
  • मनसे – 1
  • अभासे – 1

मुंबई महापालिकेतील चित्र

मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेसोबत सत्तेत थेट सहभागी (BMC BJP Opposition Party) नाही. मात्र, शिवसेनेने भाजपला 2014 मध्ये राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिल्यामुळे भाजपने मुंबई महापालिकेत महापौरपदावर दावा केला नव्हता. शिवसेनेला मुंबई महापौरपदावर दावा करण्यासाठी बहुमताचा जादुई आकडा 113 होता. त्यासाठी भाजपने शिवसेनेला बाहेरुन मदत केली होती.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.