BMC Election 2021 | मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलणार? निवडणूक आयोगासोबत बैठक

मुंबई महापालिका निवडणूक होणार की मुदतवाढ देऊन निवडणूक पुढे ढकलली जाणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. (BMC Election Election Commissioner)

BMC Election 2021 | मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलणार? निवडणूक आयोगासोबत बैठक
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार, कुणालाही प्रवेश नाही, वाचा पालिका आयुक्तांचे निर्देश
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 2:33 PM

मुंबई : निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यू. पी. एस मदान यांची मुंबई महापालिकेच्या आधिकाऱ्यांसोबत आज बैठक होत आहे. बहुप्रतीक्षित आणि शिवसेना-भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या बीएमसी निवडणुकीकडे (BMC Election 2021) अवघ्या देशाचं लक्ष आहे. मात्र मुंबई महापालिका निवडणूक वेळेवर होणार की कोरोनामुळे तिला मुदतवाढ देऊन निवडणूक पुढे ढकलली जाणार याची उत्सुकता आहे. (BMC Election 2021 Maharashtra State Election Commissioner UPS Madan to meet Mumbai Mahapalika Officials)

मुंबई महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र लिहिले होते. मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका आहे. साहजिकच या महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या खिशात ठेवण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड सुरु असते. बीएमसी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. म्हणजेच अद्याप जवळपास 9 महिन्यांचा कालावधी निवडणुकीला शिल्लक आहे. आधीपासूनच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

मुदतवाढ की वेळेवरच?

मुंबईतील कोरोना संसर्ग हळूहळू आटोक्यात येत असला, तरी तिसरी लाट येण्याचा इशाराही तज्ज्ञांकडून दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणूक होणार की मुदतवाढ देऊन निवडणूक पुढे ढकलली जाणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यू. पी. एस मदान यांची महापालिकेच्या आधिकाऱ्यांसोबत आज बैठक होणार असून बैठकीत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

शिवसेना – 97 भाजप – 83 काँग्रेस – 29 राष्ट्रवादी – 8 समाजवादी पक्ष – 6 मनसे – 1 एमआयएम – 1 अभासे – 1

काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र की स्वतंत्र?

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, असा दावा केला जात होता. मात्र मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर येताच भाई जगताप यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला होता. तर शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवण्याची चिन्हं आहेत. थेट आघाडीऐवजी काँग्रेस आणि सेना-राष्ट्रवादी यांच्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता आहे. (BMC Election Election Commissioner)

भाजपचे मिशन मुंबई

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मध्यंतरीच्या काळात राज्यातील इतर निवडणुकांमध्ये शिवसेनेची घसरण झाली असली तरी आजवर सेनेचा मुंबई महानगरपालिकेचा किल्ला अभेद्य राहिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच, असा चंग यंदा भाजपने बांधला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा एल्गार केला.

मनसेची काय भूमिका?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन झेंड्याचे अनावरण आणि शिवसेना आणि भाजप यांचा काडीमोड झाल्यापासूनच मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठींनंतर या चर्चांना हवा मिळत असे. दोन्ही पक्षांकडून कधीच युतीच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला नाही, परंतु प्रवीण दरेकर यांनी गरज पडल्यास युती करण्याची तयारी दाखवली होती.

संबंधित बातम्या :

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘एकला चलो रे’

आघाडीऐवजी मैत्रीपूर्ण लढत, BMC निवडणुकांसाठी शिवसेना-काँग्रेसचा नवा फंडा?

(BMC Election 2021 Maharashtra State Election Commissioner UPS Madan to meet Mumbai Mahapalika Officials)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.