BMC Election 2022 : तयारीला लागा, मुंबई मनपाची निवडणूक ठरल्या वेळेतच होण्याची चिन्हं, वॉर्ड पुनर्रचनेचे आदेश

BMC Election 2022 : निवडणूक घेण्याच्या दृष्टीने तयारीला लागण्याचे निर्देश, राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेला (BMC Election 2022 ) दिले आहेत

BMC Election 2022 : तयारीला लागा, मुंबई मनपाची निवडणूक ठरल्या वेळेतच होण्याची चिन्हं, वॉर्ड पुनर्रचनेचे आदेश
mumbai municiple corporation
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 12:52 PM

मुंबई : मुंबई महापालिकेची फेब्रुवारी 2022 मध्ये होणारी सार्वत्रिक निवडणूक करोनामुळे पुढे ढकलली जाण्याची चर्चा सुरु आहे. मात्र ही निवडणूक घेण्याच्या दृष्टीने तयारीला लागण्याचे निर्देश, राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेला (BMC Election 2022 ) दिले आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी दिली. करोनाची तिसरी लाट (Corona third wave) यादरम्यान आल्यास त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे राज्य सरकार निवडणुकीबाबत (State Election commission) निर्णय घेईल, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. तसंच वर्ष 2011 च्या जनगणनेनुसार वॉर्डांची पुनर्रचना करण्याचे निर्देशही निवडणूक आयोगाने दिले आहेत, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. (BMC Election 2022 Maharashtra state election commission gives go ahead for BMC polls in February 2022 Mumbai Election )

महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, मुंबईतील कोरोना, लसीकरण, दुकानं उघडण्याबाबतची भूमिका, व्यापाऱ्यांच्या मागण्या, मुंबई लोकल आणि मुंबई महापालिका निवडणूक अशा विविध विषयांवर भाष्य केलं. कोरोनाची परिस्थिती पाहून नियोजन करा, असं राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका प्रशासनाला कळवलं आहे.

मुंबई मनपा निवडणूक ठरल्या वेळेतच?

कोरोनामुळे अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. मात्र मुंबई महापालिकेची निवडणूक ठरल्या वेळेतच होण्याची चिन्हं आहेत. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपत आहे. त्यामुळे त्यावेळीच निवडणूक होणं अपेक्षित आहेत. मात्र सध्याची कोरोनाची स्थिती आणि संभाव्य तिसरी लाट पाहता, त्याबाबत त्या त्या वेळी निर्णय घेतला जाईल, असं राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेला कळवल्याचं महापौर म्हणाल्या.

मुंबई मनपाचं निवडणूक आयोगाला पत्र

मुंबई महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र लिहिले होते. मुंबई महापालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका आहे. साहजिकच या महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या खिशात ठेवण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड सुरु असते. बीएमसी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. म्हणजेच अद्याप जवळपास 9 महिन्यांचा कालावधी निवडणुकीला शिल्लक आहे. आधीपासूनच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

शिवसेना – 97 भाजप – 83 काँग्रेस – 29 राष्ट्रवादी – 8 समाजवादी पक्ष – 6 मनसे – 1 एमआयएम – 1 अभासे – 1

महाविकास आघाडी एकत्र की स्वतंत्र?

सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेतही हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र अशी चर्चा होती. मात्र मुंबई काँग्रेसची धुरा हाती घेतल्यानंतर भाई जगताप यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढू शकतात. मात्र अंतिम निर्णय काय होतो हे येत्या काळात स्पष्ट होईल. (BMC Election 2022)

मुंबई मनपावर भगवा फडकवण्याचा भाजपचा निर्धार

दुसरीकडे शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी मिशन मुंबई हाती घेतलं आहे. मुंबई मनपावर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिवसेनेच्या नाकावर टिच्चून महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायचीच, असा चंग यंदा भाजपने बांधला आहे.

मनसेची काय भूमिका?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन झेंड्याचे अनावरण आणि शिवसेना आणि भाजप यांचा काडीमोड झाल्यापासूनच मनसे-भाजप युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठींनंतर या चर्चांना हवा मिळत असे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मनसे-भाजप युती होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तर प्रवीण दरेकर यांनी गरज पडल्यास युती करण्याची तयारी दाखवली होती.

संबंधित बातम्या 

BMC Election 2021 | मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलणार? निवडणूक आयोगासोबत बैठक

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘एकला चलो रे’

आघाडीऐवजी मैत्रीपूर्ण लढत, BMC निवडणुकांसाठी शिवसेना-काँग्रेसचा नवा फंडा?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.